Share

शरद पवार साहेबांच्या चेल्यांनी सहकार चळवळीचे श्राद्ध केले – आ.सदाभाऊ खोत

Published On: 

🕒 1 min read

नांदेड – महाराष्ट्र राज्यात सहकार चळवळीची मुहूर्तमेढ धनंजयराव गाडगीळ, विठ्ठलराव विखे पाटील ,यशवंतराव चव्हाण यांनी रवली पण शरद पवार साहेबांच्या चेल्यानी सहकार चळवळीचा श्राद्ध केले आहे ,५५ सहकारी साखर कारखाने लिलावात विकून आपल्या घशात घातले व राज्यातील शेतकऱ्यांची लूट केली आहे अशी घणाघाती टीका रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आ.सदाभाऊ खोत यांनी काल मुगाव येथील शेतकरी संवाद मेळाव्यात बोलत होते.

सदाभाऊ खोत म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात सर्व धंदे बंद असताना माझ्या बापाचा शेती हा एकमेव धंदा चालू होता. शेतकऱ्यांनी सर्व जगाला पोसण्याचे काम करत होती,पण येथील व्यवस्था शेतकऱ्यांना लुटण्याचे काम करत होती. नांदेड जिल्ह्यातील गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुद्धा पीक लागू केला नाही ,जी शिवसेना विमा कंपनीचे कार्यालय फोडण्यास निघाली होती ती बिळात जाऊन बसली आहे.

शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार ही घोषणा सुद्धा हवेत विरगली, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान घोषणा चे काय झाले अश्या प्रश्ननासाठी शेतकरी, शेतमजूर, बारा बुलतेदार संकटात असताना सरकार लक्ष देत नाही, मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर येत नाही. आम्ही या विविध प्रश्नावर विधिमंडळात आवाज उठवणार होतो पण अधिवेशन दोन दिवसाचे ठेवून पळ काढण्याचे काम हे सरकार करत आहे. तिघाडी सरकारच्या विरोधात आता रस्त्यावर येऊन प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. यासाठी रयत क्रांती संघटना राज्यपातळीवर मोठे आंदोलन करेल यासाठी आपण सर्वांनी एकत्र या अशी साद घातली.

इंडिया मेघा कंपनीच्या विरोधात शेतमालाच्या रकमेसाठी पांडुरंग शिंदे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चांगले आंदोलन केले पण या  प्रश्नाकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही. या कंपनीचे मालकाला स्वस्त धान्य घोटाळा प्रकरणी ईडीने अटक केली पण आम्ही लवकरच ईडी ची भेट घेऊन,मालकांची सर्व मालमत्ता ताब्यात घेऊन शेतकऱ्यांचे पैसे द्यावे अशी विनंती करणार आहोत असे सदाभाऊ खोत म्हणाले.  अशोकराव चव्हाण राज्याचा मुख्यमंत्री राहिला माणूस दुसऱ्याच्या हाताखाली मंत्री म्हणून काम करतो म्हणजे सरपंच राहिलेला माणूस शिपाई साठी अर्ज करण्यासारखा प्रकार आहे.  हे सर्व सत्तापिपासू असणारी माणसे आहेत असे देखील खोत म्हणाले.

यावेळी माजी जि. प.सदस्य बालाजी बच्चेवार ,रयत क्रांती संघटना युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे,युवा तालुका अध्यक्ष साहेबराव,गगांजी पाटील यांची भाषणे झाली.
जिल्हाध्यक्ष विनोद वंजारे, तालुका अध्यक्ष शहाजी कदम,शिवाजी वडजे,रणजित देसाई, शंकर तमनबोईनवाड, शिवा पाटील , सुभाष कोटुरवार,आनंत पाटील, दादाराव रोडे,राघोबा मेहत्रे , शेषेराल रोडे, कुशाल लघुळे, राजेश मेहत्रे ,नारायण कोसबे सर, देविदास, किशन ताटे,विजय गाडले,संजय गंधकवाड, डोनगावे,साहेबराव डोनगावे, कोडिबा इबितदार इत्यादी व शेतकरी, युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!