Share

कोरोना लस घेतल्यानंतर परिणीतीची बिकट अवस्था; फोटो केला शेअर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने अनेक हिंदी चित्रपटात उत्तम काम केले आहे. तिच्या अभिनयाने तिने अनेक प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केल आहे. सध्या ती लंडनमध्ये असून येथे तिने फाइजर या कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. यावेळी तिने लस घेतल्यानंतरचे काही फोटो शेअर केले आहेत. हा फोटो प्रियांका चोप्राने घेतला असल्याचे तिने सांगितले आहे.

https://www.instagram.com/p/CRTsU6dDVn4/?utm_source=ig_web_copy_link

फोटो शेअर करत परिणीतीने लिहिले की, ‘मी लस घेतली आणि काही फोटो घेतले. मला खूप त्रास होतोय,’ अशा आशयाचे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे. सोबत प्रियंका चोप्राने हे फोटो घेतल्याचेही तिने आवर्जुन सांगितले आहे. लस घेतल्यानंतर परिणीती  खूश होती. पण नंतर हात दुखू लागल्यानंतर तिचा मूड बदलला असल्याचे दिसत आहे. तिचा हा फोटो सध्या व्हायरल होत असून चाहत्यांनी तिला कमेंट करत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

नुकताच प्रदर्शित झालेला परिणीतीचा ‘सायना’ या चित्रपटातील अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. परिणीतीने यात सायनाची भूमिका साकारली होती. हा सिनेमा बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या आयुष्यावर होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!