🕒 1 min read
औरंगाबाद : दलाल वाडीतील जुन्या औषधी भवन नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्याचे काम सध्या सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आणि नागरीकांच्या घरात पावसाळ्यात नाल्याचे पाणी शिरत असे. आता काम सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळेल मात्र याठिकाणी वर्षानुवर्षे साचलेला, तुंबलेला कचरा न काढताच नाल्याचे काम सुरू केल्याने नाल्याला पुन्हा पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र मनपाने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
जुन्या शहरातील दलालवाडी भागामधील नाल्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून थर्माकोल, औषधींचे बॉक्स, प्लास्टिक बॅगचा कचरा मोठ्या प्रमाणावर साचलेला आहे. यामुळे नाल्याचा प्रवाह अडवला गेला असून सांडपाणी वाहून जाण्याइतकीही जागा शिल्लक राहिलेली नाही. ही परिस्थिती कायम असल्याने दरवर्षी पावसाळ्यात फकीरवाडी, चुनाभट्टी, दलालवाडी, न्यु गुलमंडीरोड या परिसरातील शेकडो घरांमध्ये या नाल्याचे पाणी शिरून नागरिकांची ताराबंळ उडते.
घरातील साहित्यांची नासधूस होऊन आर्थिक फटका बसतो. अनेक वर्षांपासूनची ही समस्या दूर करण्यासाठी नाल्याचा प्रवाह मोकळा करणे गरजेचे होते. मात्र पस्तीस वर्षात एकदाही या नाल्याची पूर्णपणे स्वच्छता झालेली नाही. आता तीन महिन्यांपासून नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्याचे काम सुरु आहे, त्यासाठी तुंबलेला कचरा न काढताच फक्त पुढे लोटला जात आहे.
त्यामुळे नाल्याच्या पुढच्या कपारी बंद झाल्या आहेत. परिणामी, मोठा पाउस झाल्यास नागरिकांना समस्येला सामोरे जावे लागणार आहे. कंत्राटदाराच्या या प्रकारामुळे नाल्याचा प्रवाह बंद झाला आहे. परिणामी, सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुलासाठी खोदलेल्या भागात पाणी तुंबले, नाल्याचे पाणी येथील गल्लीबोळातून वाहू लागले. पुलाचे काम सुरु होऊनही मूळ समस्या जैसे-थेच असल्याचे बघून येथील नागरिकांचा जीव टांगणीला लागलेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबाद महापालिकेचा प्रगती पेट्रोल पंप ‘प्रगती’च्या मार्गावर, ९ दिवसात कमावले ६३ लाख!
- डब्ल्युटीसी २०२३! कोणत्या संघाच्या वाटेला किती सामने
- राजकीय रणनितीकर प्रशांत किशोर सक्रिय राजकारणात, काँग्रेसमध्ये करणार प्रवेश ?
- मोदी सरकारची घोषणा! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ
- पेट्राल आणि डिझेल पाठोपाठ आजपासून सीएनजीच्या किंमतीतही वाढ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
