औरंगाबाद : पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मनपाच्या पहिला पेट्रोल पंपाने सुरुवातीच्या ९ दिवसात ६३ लाख रुपयांचे उत्पन्न कमावले आहे. यामुळे मनपास चांगला महसूल मिळत असल्याचे बोलले जात आहे. येत्या काळात पालिकेकडून अशा प्रकारचे आणखी चार पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे मनपाला यातून आर्थिक दिलासा मिळेल. मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी मंगळवारी (दि.१३) याठिकाणी भेट देत पाहणी केली.
शहरात आणखी पाच पेट्रोलपंप सुरु करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. यापैकी पहिला पंप २८ जून रोजी मध्यवर्ती जकात नाक्याजवळ प्रगती पेट्रोलपंप या नावाने सुरु करण्यात आला. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या मदतीने सुरु केलेल्या पंपाचे उद्घाटन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले. या पंपाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती पालिकेच्या यांत्रिकी विभागाने दिली. पेट्रोल आणि डिझेलची विक्री या ठिकाणी केली जात आहे.
दर दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीतून पालिकेला सरासरी सात लाख रुपयांचा महसूल मिळत आहे. २८ जून ते ९ जुलै या नऊ दिवसात रोज सरासरी सात लाख रुपये याप्रमाणे ६३ लाख रुपयांचे उत्पन्न पालिकेला या पंपाच्या माध्यमातून प्राप्त झाले आहे. पालिकेचया प्रगती पेट्रोलपंपावर सध्या प्रशासकीय वाहनांचे इंधन भरले जात आहे. येत्या काळात कचरा संकलन व वाहतुकीसाठी नियुक्त केलेल्या रेड्डी कंपनीची सुमारे सहाशे वाहने आणि शंभर सिटी बसेस इंधनासाठी याच पंपावर वळविण्याचा महापालिकेचा विचार आहे.
यामुळे या वाहनांना देखील सवलतीच्या दरात इंधन मिळणार आहे. पालिकेची वाहने याच पेट्रोल पंपावरुन इंधन भरत आहे. यामुळे नऊ दिवसात पालिकेचे १.६० कोटी रुपये वाचले आहेत. पहिल्याच पेट्रोल पंपाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने पालिका प्रशासनाला हुरुप आला आहे. उर्वरित चार पेट्रोलपंप लवकर सुरु करण्याची तयारी आता प्रशासनाने सुरू केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिक्षणाचा खेळ मांडून शैक्षणिक गुणवत्ता संपविण्याचा घाट; केशव उपाध्ये यांची टीका
- ‘उद्धव ठाकरे, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा’
- आर्यलँडच्या विजयानंतर टीम इंडियाला बसला फटका, मात्र…
- SBI अलर्ट! कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी राहा सावध
- “२०१४ प्रमाणे पुन्हा धोका मिळू नये यासाठीच….,” पटोलेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला डिवचले


