Share

पेट्राल आणि डिझेल पाठोपाठ आजपासून सीएनजीच्या किंमतीतही वाढ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशात दिवसेंदिवस वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती यामुळे अनेक वाहन धारक त्रस्त झाले आहेत. महागाईमुळे सामन्यांच्या खिशाला दररोज कात्री लागत असताना गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढ होत आहे. शंभरीच्या जवळ गेलेल्या पेट्रोल आणि डीझेलमध्ये सातत्याने वाढ कायम आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलने या आधीच शंभरी पार केली आहे. एकीकडे पेट्राल, डिझेलच्या किंमती वाढत असताना सीएनजीच्या किमतीत देखील वाढ झाली आहे.

महानगर गॅस लिमिटेड या इंधन पुरवठादार कंपनीने आज मध्यरात्रीपासून मुंबईत सीएनजीच्या किमतीत प्रती किलो 2 रुपये 58 पैशांची वाढ केली आहे. त्यामुळे आता एनजीचा भाव एक किलोसाठी 51.98 रुपये इतका वाढणार आहे.

वाहतूक आणि अन्य खर्चात वाढ झाल्याने ही दरवाढ लागू करण्यात आल्याचे महानगर गॅसकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबईतील सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांच्या भाड्यातही वाढ होऊ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यामध्ये रिक्षा, कॅब, खासगी वाहनांचा समावेश आहे. तसेच लाखो ग्राहकांना सीएनजीचा पुरवठा केला जातो तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) जवळपास निम्म्या बस सीएनजीवर धावतात. यामुळे नागरिकांना या महागाईला तोंड द्यावे लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!