Share

राजकीय रणनितीकर प्रशांत किशोर सक्रिय राजकारणात, काँग्रेसमध्ये करणार प्रवेश ?

Published On: 

नवी मुंबई : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे सध्या सक्रीय राजकारणात प्रवेश करण्यासाठी हालचाली करत असल्याचे पाहायला मिळत आहे. किशोर यांनी कालच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे प्रशांत किशोर लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

राजकीय रणनीती करण्याच्या कामातून संन्यास घेण्याची पीके यांनी आधीच घोषणा केली होती. त्यामुळे ते सक्रिय राजकारणात येण्याच्या चर्चेला अधिकच बळ मिळत आहे. प्रशांत किशोर यांनी काल राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सोनिया गांधी यांच्याशीही ऑनलाईन संवाद साधला. केसी वेणुगोपालही या बैठकीला उपस्थित होते. तब्बल तासभर ही बैठक चालली. या बैठकीत देशाचा राजकीय कल, देशातील काँग्रेसची सध्याची स्थिती आणि त्यावरील उपाय यावरही या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती सध्या मिलाट आहे.

तसेच प्रशांत किशोर आणि गांधी कुटुंबीयांमध्ये पंजाब किंवा उत्तर प्रदेश विधानसभेच्या मुद्द्यापेक्षा मोठी चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये मोठी भूमिका दिली जाण्याची शक्यता असल्याची चिन्हं आहेत. प्रशांत किशोर आणि राहुल गांधी यांची भेट २०१७ साली उत्तरप्रदेश निवडणुकीवेळी झाली होती. त्यावेळी किशोर यांच्या रणनीतीला यश आले नव्हते. काँग्रेसचा दणदणीत पराभव झाला होता.

दरम्यान निवडणूक रणनितीकार म्हणून आपण आपलं काम थांबवत आहोत, असं प्रशांत किशोर यांनी जाहीर केलं होतं. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याची अधिकृत घोषणा केली होती. त्यामुळे ते आता कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून सक्रीय राजकारणाला सुरुवात करतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!