मुंबई : जुन महिन्यात भारत आणि न्युझीलंड संघात जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारताचा न्युझीलंडने ८ गडी राखुन पराभव केला. यासह न्युझीलंडने पहिल्यावहिल्या डब्ल्युटीसी स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
आयसीसीने बुधवारी डब्ल्युटीसी स्पर्धेच्या नव्या वेळापत्रकाची घोषणा केली. या वेळापत्रकानुसार प्रत्येक संघाला घरच्या मैदानावर ३ तर परदेशात ३ मालिका खेळायच्या आहेत. मात्र मागील स्पर्धेप्रमाणे प्रत्येक संघाच्या सामन्याची संख्या ही समान नाही. डब्ल्युटीसी २०२३ स्पर्धेत सर्वाधीक सामने इंग्लंडचा संघ खेळणार आहे. सर्वाधीक सामने खेळण्याच्या यादीत इंग्लंडनंतर भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.
डब्ल्युटीसी स्पर्धेत भारतीय संघ १९ कसोटी सामने खेळणार आहे. यानंतर ऑस्ट्रेलिया १८ आणि दक्षिण अफ्रिका १५ कसोटी सामने खेळतील. तर पहिल्या स्पर्धेतील विजेता न्युझीलंडचा संघ १३ कसोटी सामने खेळणार आहे. तर वेस्ट इंडिज आणि श्रीलंका संघही प्रत्येकी १३ सामने खेळणार आहे. पाकिस्तान १४ आणि बांग्लादेश १२ सामने खेळणार आहे. डब्ल्युटीसी स्पर्धेच्या पहिल्या सत्रात भारतीय संघ १७ सामने खेळला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणीसंग्रहालय, जागेसाठी प्रस्ताव पाठवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश!
- शिक्षणाचा खेळ मांडून शैक्षणिक गुणवत्ता संपविण्याचा घाट; केशव उपाध्ये यांची टीका
- ‘उद्धव ठाकरे, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा’
- आर्यलँडच्या विजयानंतर टीम इंडियाला बसला फटका, मात्र…
- SBI अलर्ट! कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी राहा सावध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

