मुंबई : खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्रं सुरू केलं आहे. यामुळे बीड जिल्ह्यासह राज्यभरात ७० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यानंतर आज हे समर्थक पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले आहेत. या कार्यकर्त्यांना पंकजा यांनी मार्गदर्शन केले.
‘माझ्या चेहऱ्यावरील आनंद तुम्ही घेवून जा, तुमचे दु:ख माझ्या पदरात टाका, आणि हसऱ्या चेहऱ्याने परत जिल्ह्यात जा,’ असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. तसेच यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधन करताना त्यांनी भाजपला सूचक इशारा दिल्याचे दिसले. ‘ कुणालाही पदावरून खाली खेचून मला माझी शक्ती वाया घालवायची नाही. माझी शक्ती या छोट्याशा मंडपात पुरणार नाही, असं सांगतानाच शक्तीच दाखवायची असती आणि दबावच आणायचा असता तर त्यासाठी ही जागा पुरणार नाही,’ असा सूचक इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.
तसेच यावेळी बोलताना त्या म्हणाल्या कि, ‘लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून अनेक आमदार खासदारांना निवडून दिलं. खूप कष्टाने लोक त्या पदावर पोहोचत असतात. त्यांना त्या पदावरून खेचून मी माझी शक्ती वाया घालवणार नाही आणि माझी शक्ती या मंडपात पुरणारही नाही. शक्ती दाखवायची असती आणि दबाव आणायचा असता तर दबाव तंत्रासाठी ही जागा पुरणारन नाही.
मला जर दबाव तंत्र करायचा असेल तर मला फार मोठी जागा लागे. पण मला दबाव आणायचाच नाही, असं पंकजा यांनी सांगितलं. आम्ही कधीच कुणाच्या समोर कधीच कुठलीही मागणी केली नाही,’ असेही पंकज मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- हाताच्या पंजाने ‘वाघ’ पुन्हा गारद; शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- पुढे मार्ग खडतर दिसतो पण आपण संघर्ष करत राहू – पंकजा मुंडे
- ‘पंकजा तुम्ही जास्त बोलता…’ ; ‘त्या’ बैठकीत मोदींनी घेतली भाजप नेत्यांची शाळा
- ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा’
- आपण काय बोलतोय याचं भान ठेवलं पाहिजे; शिवसेनेचे पटोलेंना प्रत्युत्तर


