मुंबई : बॉलीवूड अभिनेता अनिल कपुर यांचा मुलगा हर्षवर्धन कपुरचा नुकताच ‘रे’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे सर्वस्तरातुन कौतुक होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान हर्षवर्धनने एक मोठा खुलासा केला आहे.
‘रे’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना हर्षवर्धनने बॉलीवुड अभिनेत्री प्रियंका चोप्रामुळे आपल्या हातातुन एक हॉलीवूडपट निसटला असल्याची माहिती दिली. यावेळी तो म्हणाला, ‘रमीन बहरानी यांचा ‘द व्हाइट टायगर’ या चित्रपटात राजकुमार रावने साकारलेल्या पात्रासाठी माझी निवड निश्चीत झाली होती. त्याने या भूमिकेसाठी ऑडीशन दिले होते. त्याचा सहभाग जवळपास चित्रपटात नक्की झाला होता.’ असे तो म्हणाला.
यावेळी पुढे बोलताना तो म्हणाला की,’ माझा सहभाग नक्की झाल्यानंतर चित्रपटात प्रियंका चोप्राची एन्ट्री झाली आणि हा चित्रपट माझ्या हातातुन निसटला. कारण निर्मात्यांना प्रियंकाला साजेसा अभिनेता हवा होता. माझं वय प्रियंकापेक्षा कमी असल्याने द व्हाईट टायगर चित्रपट माझ्या हातातुन निसटला.’. केवळ वय कमी असल्यामुळे हर्शवर्धन कपुरची हॉलीवुडवारी हुकली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राष्ट्रवादीने आधी सर्व जागांसाठी उमेदवार शोधावेत आणि मग भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवर टीका करावी’
- पटोलेंसारख्या लहान माणसांबाबत मी कशाला बोलू ? – शरद पवार
- हरलीनच्या ‘त्या’ कॅचवर महिंद्रा यांची विशेष टिप्पणी, म्हणाले…
- मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी लसीकरण बंद ; कोरोनाची तिसरी लाट रोखणार कशी?
- ‘सत्ता हातून गेल्याने देवेंद्र फडणवीस यांना संन्यास घेण्याची भाषा करावी लागत आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

