पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील हे सध्या केंद्राचे अपयश हे कसे यश आहे हे सांगत राहणे, राज्य सरकारवर विनाकारण आरोप करणे आणि पुणे महानगरपालिकेचे अपयश झाकत राहणे, या केवळ तीन भूमिकेत वावरत असतात, अशी टीका पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली होती.
जगताप यांच्या टीकेवर भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एकच गोष्ट वारंवार सांगितली की खरी वाटायला लागते, याच भावनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष धादांत खोट बोलत असतात. पण पुणेकर सुज्ञ आहेत. राष्ट्रवादीच्या नाकर्तेपणाला ते चांगलेच ओळखून आहेत, असं मुळीक म्हणाले.
यासोबतच, ‘चंद्रकांत पाटील यांनी काय काम केले हे विचारणाऱ्यांनी कधीतरी चंद्रकांतदादांच्या कोथरूड मतदारसंघात यावे आणि त्यांनी केलेल्या अफाट सेवाकार्याचा अभ्यास करावा. अर्थात यांच्या पक्षाचं अस्तित्वही जिथे नाही तिथे कोणी काय काम केलं हे त्यांना कसं समजणार ?’ असा खोचक टोला देखील जगदीश मुळीक यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष फक्त माध्यमात सापडतात, कामाच्या नावाने शून्य !?
पुढे त्यांनी, ‘पुणे मनपा ताब्यात घेण्याची वलग्ना करणाऱ्यांनी आधी सर्व जागांसाठी उमेदवार शोधावेत आणि मग भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवर टीका करावी. राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षांनी प्रसिद्धी मिळवण्याचे पोरखेळ बंद करून स्वतःच्या पक्षातील अस्तित्वाकडे अधिक लक्ष द्यावे,’ असा सल्ला देखील दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- पटोलेंसारख्या लहान माणसांबाबत मी कशाला बोलू ? – शरद पवार
- हरलीनच्या ‘त्या’ कॅचवर महिंद्रा यांची विशेष टिप्पणी, म्हणाले…
- मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी लसीकरण बंद ; कोरोनाची तिसरी लाट रोखणार कशी?
- ‘सत्ता हातून गेल्याने देवेंद्र फडणवीस यांना संन्यास घेण्याची भाषा करावी लागत आहे’
- ‘सोबत राहूनही पाठीत सुराच खुपसायचा असेल तर…’; पटोलेंच्या विधानाने आघाडीतील बिघाडी उघड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

