🕒 1 min read
बारामती : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून राज्यात सत्ता स्थापन केल्यापासून काही ना काही मुद्द्यांवरून आघाडीत बेबनाव असल्याचं वारंवार समोर येत आहे. दरम्यान, राज्यात काँग्रेसने अधिक आक्रमक रूप धारण करण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा नाना पटोले यांच्या हाती सोपवली. महाराष्ट्र काँग्रेसची सूत्रे नाना पटोले यांच्याकडे गेल्यापासून त्यांनी देखील आक्रमक रूप घेतले आहे.
काँग्रेस आमदारांना-मंत्र्यांना कामासाठी मिळणारा निधी यावरून उघड नाराजी, अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत नाराजी यासह येत्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा स्वबळाचा नारा यामुळे महाविकास आघाडीतील तणाव गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याचं दिसून येत आहे.
अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल पुण्यात बोलताना उघड नाराजी व्यक्त केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यासोबतच, ज्या लोकांना तडजोड करायची नसेल, सोबत राहूनही पाठीत सुराच खुपसायचा असेल तर आपल्याला काही बोलायचंच नाही. तो राग ताकद बनवा,’ असं म्हणत नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना स्वबळाच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत.
यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात असतानाच महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक टिप्पणी केली आहे. बारामतीमध्ये त्यांना पत्रकार परिषदेत नाना पटोले यांच्या विधानाबद्दल विचारले असता, ‘मी गोष्टीत मी पडत नाही. ती लहान माणसं आहेत. त्यांच्याबाबत मी कशाला बोलू ? सोनिया गांधी काही बोलल्या असत्या तर मी बोललो असतो,’ असं विधान शरद पवार यांनी केलं आहे.
नेमकं काय म्हणाले होते पटोले ?
‘आता बारामतीवाले पुण्याचे पालकमंत्री आहेत ते कुणाची कामं करतात… आपल्या लोकांची कामं करतात का? मग आपण संपर्कमंत्र्यांना लक्ष घालायला सांगतो, पण संपर्कमंत्र्यांचं ऐकायचं की नाही ते त्यांनी ठरवायचं… कारण सही त्यांची लागते. संपर्कमंत्र्यांची सही लागत नाही,’ असा टोला पटोलेंनी लगावला.
यासोबतच, ‘कोणत्याही समितीवर नावं पाठवायची असतील, तर पालकमंत्र्यांची सही लागते. हा जो त्रास आहे, या त्रासाला तुम्ही आपली ताकद बनवा. या त्रासाला आपली मानसिक कमजोरी बनवू नका. जो त्रास तुम्हाला आज मिळतोय… आमचा हिस्सा असतानाही आम्हाला देत नाहीत ना ठीक आहे. पण मी माझ्या कर्माने उद्याच्या काळात इथला पालकमंत्री बनेल… आमच्या पक्षाचा माणूस या खुर्चीवर बसेल ही ताकद घेऊन निघालं पाहिजे. ज्या लोकांना तडजोड करायची नसेल, सोबत राहूनही पाठीत सुराच खुपसायचा असेल तर आपल्याला काही बोलायचंच नाही. तो राग आपल्याला ताकद बनवायचा आहे,’ असं रोखठोक भाष्य करत नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना स्वबळाची तयारी करण्यास सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ‘मैने खुद ये शहादत चुनी है’ ; अजय देवगनचा बहुचर्चित ‘भुज’चा टीझर रिलीज
- हरलीनच्या ‘त्या’ कॅचवर महिंद्रा यांची विशेष टिप्पणी, म्हणाले…
- मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी लसीकरण बंद ; कोरोनाची तिसरी लाट रोखणार कशी?
- दिडशतकी खेळीनंतर महमूदूल्लाहने निवृत्ती जाहिर करत दिला मोठा धक्का
- ‘सोबत राहूनही पाठीत सुराच खुपसायचा असेल तर…’; पटोलेंच्या विधानाने आघाडीतील बिघाडी उघड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

