🕒 1 min read
बारामती : महाविकासआघाडीतील पक्षांनी स्वबळाची भाषा करण्यात काहीही गैर नाही, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले. प्रत्येकजण आपला राजकीय पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करणार की नाही? त्यामुळे ते आपलं बळ वाढवण्याचा प्रयत्नात असणार. आम्ही सरकार एकत्र चालवतो, याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्रित चालवत नाही. पक्ष आम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने चालवतो. प्रत्येकाला आपल्या पक्षाची व्याप्ती वाढावी अशी इच्छा असणार.. यात काहीही चुकीचे नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. ते रविवारी बारामतीमध्ये बोलत होते.
दरम्यान, स्वबळाबाबत मी जे बोललो त्यात मी माघार घेणार नाही. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कामाला लागावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना कामाला लागा असं सांगितलं. म्हणजे मी स्वबळावर लढण्याबाबत बोलत होतो तर त्रास होत होता आणि आता ते बोलले तर ते ठीक आहे, असे वक्तव्य कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते त्यावर शरद पवारांनी भाष्य केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये तिन्हीही पक्ष स्वबळाची भाषा करत आहेत. कॉंग्रेस राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे त्यांनी घोषित केले आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गावागावात शिवसंपर्क अभियान सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. आता शरद पवार यांनी देखील स्वबळावर नारा दिल्याने चर्चांना उधान आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘होय मी मुस्लीम आहे पण…’ ; बाबिलचं ट्रोलर्सना सडेतोड प्रत्युत्तर
- ‘देशातील सर्व सहकारी संस्थांना अधिक सक्षम करण्याचा सरकारचा निर्धार’
- सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात विंडीजची कांगारुवर मात; ५६ धावांनी केले पराभूत
- यूपी लोकसंख्या विधेयक : दोनहून अधिक अपत्ये असल्यास सरकारी नोकरी नाही
- जालना रोडवरील वाहतूक व्यवस्थेत १६ जुलैपर्यंत अंशतः बदल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
