Share

‘होय मी मुस्लीम आहे पण…’ ; बाबिलचं ट्रोलर्सना सडेतोड प्रत्युत्तर

Published On: 

मुंबई : 29 एप्रिलला अभिनेते इरफान खान यांचे निधन झाले. याच्या दुसऱ्या दिवशीच 30 एप्रिलला ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला आहे. बॉलिवूडने एकापाठोपाठ एक दोन दिग्गज अभिनेत्यांना गमावले आहे. यामुळे फिल्म इंडस्ट्रीला हा मोठा धक्का आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीला मागील वर्ष तितकसं चांगलं गेलं नाही. यंदा बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचं दुर्दैवी निधन झालं

अभिनेता इरफान खान  इरफान जरी गेला असला तरी त्याच्या मुलाच्या आणि पत्नीच्या मनात तो अजूनही घर करुन आहे. इरफान यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा बाबिल खान सोशल मीडियावर आपल्या वडिलांच्या आठवणी शेअर करताना दिसतो. नुकतीच बाबिलची एक पोस्ट चर्चेत आली आहे. काही दिवसांपासून नेटकरी त्याला मुस्लीम धर्मावरुन ट्रोल करत आहेत. या ट्रोलर्सला आता त्यानं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्याने ट्रोलर्सला चांगलेच सुनावले आहे. पोस्ट मध्ये बाबिल म्हणाला, “होय मी मुस्लीम आहे. पण मी कुणारसोबतच गीता आणि बायबल देखील वाचतो. मी बायबल, भगवत गीता आणि कुराण तिन्ही गोष्टी वाचल्या आहेत. सध्या मी गुरु ग्रंथ साहेब वाचतोय. मी सर्व धर्मियांचा आदर करतो. धर्माचा उपयोग आपण एकमेकांची मदत करण्यासाठी करायला हवा. हीच खरी धर्माची व्याख्या आहे.” अशा आशयाची पोस्ट करत त्याने ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!