Share

सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात विंडीजची कांगारुवर मात; ५६ धावांनी केले पराभूत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात पराभवाचे तोंड बघावे लागले. वेस्ट इंडिजने दिलेल्या १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठालाग करताना ऑस्ट्रेलियाचा संपुर्ण डाव १४० धावांत अटोपला. या विजयासह वेस्ट इंडिजने पाच सामन्याच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

सलग दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीसाठी वेस्ट इंडिजला पाचारण केले. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ४ गडी गमावत १९६ धावांची भक्कम धावसंख्या उभी केली. वेस्ट इंडिजकडु शिम्रॉन हेटमायरने ३६ चेंडुत २ चौकार आणि ४ षटकारासंह ६१ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर ऑस्ट्रेलियाकडुन हेजलवुड, अगर आणि मार्षने प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा केवळ १४० धावांपर्यंत मजल मारता आली. मागील सामन्यातील मिचेल मार्षने या सामन्यातही चांगली कामगिरी केली. त्याने ऑस्ट्रेलियाकडुन ४२ चेंडुत ५ चौकार आणि १ षटकारासंह ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त जोश फिलीप(१३) आणि मोईसेस हेनरिक्स(१९) वगळता इतर फलंदाज दुहेरी धावसंख्यादेखील ओलांडु शकले नाही. हेडन वॉल्शने वेस्ट इंडिजकडुन सर्वाधिक ३ गडी बाद केले. अर्धशतकासाठी शिम्रॉन हेटमायरला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!