Share

शहर वासियांना आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा करा, मनसेची मनपा आयुक्तांकडे मागणी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शहरात पाणी पुरवठ्याचा प्रश्न जटील होत आहे. अनेक भागात आठ ते दहा दिवसांनी पाणी येत आहे. नुकतीच पालकमंत्र्यांनी आठवड्यातून दोन दिवस शहरवासीयांना पाणी देण्याची सूचना प्रशासनाला केली होती. त्यात आढे-वेढे आणून मनपा आयुक्तांनी शक्य नसल्याचे सांगितले. त्यात आता मनसेने उडी घेत आठवड्यातून दोन दिवस पाणी देण्याची मागणी केली आहे. १० दिवसात मागणी पूर्ण न झाल्यास आयुक्तांचे नळ कनेक्शन तोडण्याचा इशारा मनसे तर्फे देण्यात आला आहे.

दोन वर्षांपूर्वी शहरात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणाची पातळी मृत साठ्यापर्यंत गेली होती. आता धरणात मुबलक पाणी असून देखील शहर वासियांना पाण्यासाठी हाल सोसावे लागत आहे. त्यात मनपा प्रशासन राज्यात कुठे नसेल एवढी पाणीपट्टी वसूल करीत आहे. सिटी वॉटर युटीलीटी कंपनी सोबत झालेल्या २०११ च्या करारात दरवर्षी १० टक्क्यांनी पाणीपट्टी वाढण्याचे ठरले होते. त्या कंपनीने काम न सुरु करताच शहरवासीयांकडून ३ वर्ष पाणीपट्टी घेतली आणि तिची रक्कम देखील चार हजारांच्या घरात पोहचवली.

दरम्यान, आठवड्यातून दोन दिवस पाणी न आल्यास मनपा आयुक्तांच्या बंगल्यात असलेल्या नळाचे कनेक्शन तोडणार असल्याची माहिती उपस्थित मनसे पदाधिकार्यांनी दिली. त्याबरोबरच शहर वासियांना पाणीपट्टी न भरण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा संघटक बिपीन नाईक, वैभव मिटकर, संकेत शेटे, राहुल पाटील, प्रशांत दहीवदकर यांची उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!