🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा सुरू असताना यात डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. यात काही माध्यमांनी खासदार डॉ. प्रीतम मुंडे या दिल्लीत दाखल झाल्या असल्याचे वृत्त दिले होते. मात्र, पंकजा मुंडे यांनी या चर्चा निरर्थक असल्याचे म्हटले आहे. आम्ही आमच्या मुंबईतील निवासस्थानी असल्याचे त्यांनी सांगितले.
या संदर्भात आमदार पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिलीय. त्यांनी लिहिले की, ‘खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पाहिली ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी प्रीतम ताई आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबईच्या निवासस्थानी आहोत.’
खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पाहिली ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी प्रीतम ताई आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबई च्या निवासस्थानी आहोत..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) July 7, 2021
केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागते या विषयी चर्चा सुरू आहे. त्यात ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्यासह मराठवाड्यातून एका चेहऱ्याला संधी देण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यात डॉ. भागवत कराड यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र, गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या डॉ. प्रीतम मुंडे यांना संधी देण्याची मागणीही होत होती. मात्र, त्या अजूनही मुंबईतच असल्याचे वृत्त पंकजा यांनी दिल्याने डॉ. प्रीतम यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला पूर्णविरोम मिळाल आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भारतीय चित्रपटसृष्टीचा दीपस्तंभ ढासळला – अजित पवार
- अधिवेशन संपले तरीही अडचणी सुरूच; मुख्यमंत्र्यांच्या समोर आता नवे आव्हान काय असणार ?
- ‘सिनेमाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा…’; बिग बींची भावूक पोस्ट
- अभिनेता सुयश टिळकने ‘या’ अभिनेत्रीसोबत केला साखरपुडा
- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपने नेमकं काय कमावलं आणि काय गमावलं ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
