मुंबई : आगामी आयपीएल स्पर्धेत बीसीसीआयने दोन नवीन संघाच्या समावेशावर जवळपास शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे आगामी स्पर्धेपुर्वी खेळाडूंचा लिलाव होणार हे नक्की झाले आहे. या लिलावाचा सर्वात जास्त फटका मुंबई इंडियन्सला बसणार आहे. कारण समोर आलेल्या माहितीनुसार प्रत्येक संघाला ४ खेळाडू रिटेन करता येणार आहे. तर या चार खेळाडूंत केवळ २ विदेशी खेळाडूंना रिटेन करता येईल.
मागील काही वर्षात मुंबईच्या संघाने जो समतोल राखला आहे. त्यामुळे संघातील प्रत्येक खेळाडू महत्वाचा आहे. या परिस्थीतीत मुंबई कोणत्या खेळाडुला रिटेन करणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. कारण रोहित शर्मा, जसप्रित बुमराह आणि कायरान पोलार्ड हे तीन खेळाडू हमखास रिटेन होईल. चौथ्या स्थानासाठी मुंबई कोणत्या खेळाडुची निवड करायची ही समस्या मुंबई संघासमोर आहे.
विदेशी खेळाडूमध्ये नाव आहे सलामीवीर क्विंटन डिकॉक आणि ट्रेंट बोल्ट यांचे. डिकॉक बऱ्याच कालावधीपासुन मुंबईकडुन रोहितसोबत सलामीला फलंदाजी करतो. तर ट्रेंट बोल्ट हा गेल्या काही मोसमापासुन मुंबईच्या गोलंदाजीचा प्रमुख गोलंदाज बनला आहे. तर भारतीय खेळाडूत इशान किशन का सुर्यकुमार यादव या दोघात चुरस सुरु आहे. याशिवाय कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, राहुल चहर यासारख्या खेळाडुना गमवावे लागु शकते. आणि गमावलेल्या खेळाडुंना जर संघात घ्यायचे असेल तर मोठी रक्कम मोजावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- १२ वी पास उमेदवारांना सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी
- ‘बाजीराव ते कपील देव’ अष्टपैलु रणवीरचे ३६व्या वर्षात पदार्पण!
- …अन् रैनानं स्वीकारलं कोहलीचं चॅलेंज ; पाहा मजेदार व्हिडीओ
- नारायण राणे होणार केंद्रीय मंत्री ?, दिल्लीहून आले तातडीचे बोलावणे
- निवड समिती अध्यक्षांच्या हट्टामुळे पृथ्वी शॉ इंग्लंड दौऱ्याला मुकला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

