Share

१२ वी पास उमेदवारांना सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: मागील वर्षापासून देशात  कोरोनाचे संकट असल्यामुळे अनेकांना विविध अडचणींचा सामाना करावा लागला आहे. यातच या काळात अनेकजण बेरोजगार आले आहेत. यामुळे अनेकजण चिंतेत आहे. यातच जे तरूण पदवीधर नाहीत अशांना नोकरीचा मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. मात्र आता काळजी करण्याची गरज नाही कारण पदवीधर नसलेल्या तरुणांसाठी देखील नोकरीची एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची कंपनी ऑईल इंडिया लिमिटेडने कनिष्ठ सहाय्यक (लिपिक-कम-कॉम्प्युटर ऑपरेटर) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्याअंतर्गत कनिष्ठ सहाय्यक पदासाठी १२० रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. कनिष्ठ सहाय्यक पद भरती २०२१ साठी १५ ऑगस्टपर्यंत कंपनीच्या Oil India.com या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.

वयोमर्यादा

ओपन वर्ग -किमान 18 वर्षे आणि कमाल 30 वर्षे

ओबीसी वर्ग  – किमान 18 वर्षे आणि कमाल 33 वर्षे

एससी आणि एसटी वर्ग  – किमान 18 वर्षे आणि कमाल 35 वर्षे

शैक्षणिक पात्रता 

कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 40 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण असावं लागणार आहे. त्यासह किमान सहा महिन्यांचा कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स केलेला असणं आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया 

  • कॉम्प्युटर बेस्ड टेस्टच्या आधारे उमेदवारांची निवड
  • ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कमीतकमी 50 टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे.
  • अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही अट 40 टक्के आहे.
  • कॉम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये एकूण तीन भाग आहेत.
  • इंग्रजी भाषा आणि सामान्य ज्ञान, रिझनिंग, गणित, संख्यात्मक आणि मानसिक क्षमता, तांत्रिक ज्ञान अशा विषयांचा यात समावेश असतो.
  • इंग्रजी भाषा आणि सामान्य ज्ञान हा एक भाग असतो, तर रिझनिंग, गणित, आणि मानसिक क्षमता हा एक विभाग असतो.
  • इंग्लिश आणि उमेदवाराची प्रादेशिक भाषा अशा दोन्ही भाषेत हे प्रश्न उपलब्ध असतात.
  • या दोन्ही विभागात प्रत्येकी 20 टक्के प्रश्न येतात तर 60 टक्के प्रश्न तांत्रिक ज्ञानावर अर्थात टेक्निकल नॉलेजवर आधारीत असतात.
  • एमसीक्यू म्हणजे मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स पद्धतीने ही परीक्षा होते. यात निगेटीव्ह मार्किंग नसतं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!