🕒 1 min read
औरंंगाबाद : दुसऱ्याच्या नावावर असलेल्या शेतजमीनीचे बनावट कागदपत्रे तयार करून विक्री करून दांम्पत्याची २२ लाख १७ हजार रूपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दांम्पत्याची फसवणूक केल्याचा प्रकार १५ फेब्रुवारी २०२१ रोजी सातारा परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालयात घडला असल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
अर्जुन सखाराम तांबे (रा.सांजखेडा,ह.मु.मुकुंदनगर, मुकुंदवाडी), जमीनीचे बनावट मालक रामभाऊ कचरू सरोदे (रा.टिव्ही सेंटर), रामा गोविंद सरोदे (रा.शिवाजीनगर) यांच्यासह एक महिला आरोपीचा बनावट कागदपत्राच्या आधारे जमीन विक्री करून फसवणूक करणा-यांत समावेश आहे.
चंद्रशेखर प्रकाशराव पाटील (वय ४६,रा.सिडको एन-६) यांनी सांजखेडा येथील गटक क्रमांक २१० मध्ये असलेली शेतजमीन खरेदी करण्यासाठी अर्जुन तांबे यांच्यासोबत संपर्क साधला होता. त्यावेळी तांबे याने रामभाऊ सरादे व रामा सरोदे यांची जमीन विक्री असल्याचे सांगून त्यांना कागदपत्रे दाखवली होती. चंद्रशेखर पाटील यांनी जमिनीबाबत चौकशी केली असता कागदपत्रे बनावट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आली होती. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! प्रणव मुखर्जींचे पुत्र ‘तृणमूल’मध्ये
- मोहन भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ओवेसी म्हणाले, ‘ही तर हिंदुत्त्वाचीच देण’
- ‘हिंदू-मुस्लिम वेगवेगळे नाहीत, सर्वांचा डीएनए एकच’, मोहन भागवत यांचे वक्तव्य
- ‘मराठा समाजाच्या प्रश्नांवर वादविवाद नकाे’, संभाजीराजेंचे आवाहन
- ‘इम्पेरिकल डेटा केवळ राज्य सरकार गोळा करू शकते, ठराव फक्त दिशाभूल करण्यासाठी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
