🕒 1 min read
कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बरेच नेते तृणमूलमध्ये सामील होत आहेत. नुकतेच मुकुल रॉय यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. आता कॉंगेस नेते अभिजित मुखर्जीही तृणमूलमध्ये दाखल झाले आहेत.
अभिजित मुखर्जी हे स्व. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी आज ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.ज्या प्रकारे भाजपच्या जातीय हिंसाचाराच्या लाटेला ममता बॅनर्जी यांनी रोखले, मला विश्वास आहे की भविष्यात इतरांच्या पाठिंब्याने त्या संपूर्ण देशात अशीच कामगिरी करू शकतील,असे वाटत असल्यानेच मी तृणमूलमध्ये प्रवेश केला असल्याचे अभिजीत मुखर्जी यांनी म्हटले. अखंडता आणि धर्मनिरपेक्षता राखण्यासाठी मी काम करेन, असे अभिजित मुखर्जी यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हटले.
प्राथमिक सभासद वगळता मला काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही गटामध्ये सामील केले नव्हते. म्हणून मी टीएमसीमध्ये सैनिक म्हणून रुजू झालो आहे आणि पक्षाच्या सूचनांनुसार काम करेन. अखंडता आणि धर्मनिरपेक्षता राखण्यासाठी मी काम करेन असे अभिजित मुखर्जी यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हटले.
२०१२ आणि २०१४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर अभिजित मुखर्जी यांनी बंगालमधील जंगीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि जिंकली होती. काँग्रेसने त्यांना या जागेवरुन २०१९ मध्येही तिकीट दिले, पण त्यांचा पराभव झाला होता. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची कामगिरी ही प्रचंड निराशाजनक झाल्याचे दिसून येत आहे. कॉंग्रेसचा बंगालमधील जनाधार मोठ्याप्रमाणावर घसरला असून पक्षात मोठ्याप्रमाणात गटबाजी देखील दिसून येत आहे.
याशिवाय कॉंग्रेस पक्षात भविष्य दिसत नसल्यानेच मुखर्जी यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्याचं सांगितले जात आहे. अभिजित मुखर्जी यांच्या पक्ष प्रवेशानंतर कॉंग्रेसमधील आणखी काही नेते तृणमूलमध्ये प्रवेश करतील असा अंदाज व्यक्त केला जात असून राजकीय समीकरणे देखील बदलतील असे सांगितले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोहन भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ओवेसी म्हणाले, ‘ही तर हिंदुत्त्वाचीच देण’
- ‘हिंदू-मुस्लिम वेगवेगळे नाहीत, सर्वांचा डीएनए एकच’, मोहन भागवत यांचे वक्तव्य
- ‘मराठा समाजाच्या प्रश्नांवर वादविवाद नकाे’, संभाजीराजेंचे आवाहन
- ‘इम्पेरिकल डेटा केवळ राज्य सरकार गोळा करू शकते, ठराव फक्त दिशाभूल करण्यासाठी’
- ओबीसी आरक्षणासाठी केंद्राने इम्पेरिकल डेटा देण्यासाठीचा ठराव विधानसभेत मंजूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
