Share

‘अनिल देशमुख देखील असेच मधात बोलत होते, आता ते आत जाताहेत’, मुनगंटीवारांचे सभागृहात वादग्रस्त वक्तव्य

Published On: 

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुधीर मुनगंटीवार राज्य सरकारच्या कारभारावर हल्लाबोल करत असताना सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी त्यांना टोकण्याचा प्रयत्न केला. त्यावर संतापलेल्या मुनगंटीवारांनी अनिल देशमुख देखील असेच मध्ये मध्ये बोलत होते, आता ते आत जात आहेत, अशी धमकीच सभागृहात दिली.

सभागृह सुरू झाल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला सुरुवात केली. त्यानंतर 50ए अंतर्गत सुधीर मुनगंटीवार यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. मुनगंटीवार बोलत असतानाच सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी मुनगंटीवार यांना मध्ये मध्ये टोकण्याचा प्रयत्न केला. त्यावर ‘अनिल देशमुख असेच मधात बोलले. आता आत जात आहेत. त्यामुळे मधात बोलू नका. मी हरकतीच्या मुद्द्यावर बोलत आहे. हा माझा अधिकार आहे. तुम्ही मध्ये मध्ये बोलण्याचे कारण नाही. सरकारची चमचेगिरी सुरू आहेट, असे मुनंगटीवार म्हणाले.

त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच आक्रमक झाले. मुनगंटीवार सभागृहात धमकी देत आहे का?, असा सवाल पटोले यांनी केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी हे विधान कामकाजातून वगळण्यास सांगितले. त्याला भास्कर जाधव यांनी विरोध केला. मुनगंटीवार यांनी मला धमकी दिली आहे. हे कामकाजातून काढून टाकू नका. त्यांनी मला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आहे. ते रेकॉर्डवरच ठेवा. राज्यात सध्या तेच चालू आहे. ईडी, सीबीआय, एसआयटी लावली जात आहे. त्यामुळे त्यांचं विधान रेकॉर्डवरून काढू नका, असे जाधव म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!