🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोना डेल्टा प्लस चे नवीन व्हेरीअंटचा एकही रुग्ण शहरात नाही. तरीसुद्धा शासनाने नवीन नियमावली लागू करत बाजारपेठेच्या वेळा कमी केल्या. गेल्या दोन वर्षापासून कोरोना संक्रमणामुळे व्यापारी व व्यापार्यावर अवलंबून असणारे कर्मचारी व त्यांचे कुटुंब प्रचंड आर्थिक अडचणीत आहेत. शासनाकडूनही व्यापाऱ्यांसाठी कोणतेही आर्थिक पॅकेज मिळत नाही.
यासंदर्भात जिल्हा व्यापारी महासंघ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सोबत चर्चा करून व्यापाऱ्यांच्या अडचणी त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या तसेच शहरातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती आटोक्यात असून शहरातील बाजारपेठेवर वेळेबाबत घातलेले निर्बंध शिथिल करून सकाळी सात ते रात्री सात पर्यंत ची वेळ निश्चित करण्यात यावी.
सोमवार ते रविवार पर्यंत बाजारपेठ उघडण्यास परवानगी देण्यात यावी औरंगाबाद शहर पर्यटनाची राजधानी असून शनिवार-रविवार बाजारपेठ बंद असल्यास चुकीचा संदेश जात आहे. अशा प्रकारच्या मागण्या प्रामुख्याने समोर ठेवण्यात आल्या. याबाबत आरोग्यमंत्र्यांनी तुपे यांच्याशी चर्चा करून मुंबईला गेल्यानंतर व्यापाऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे सुचक वक्तव्य याप्रसंगी केले व व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्नही केला.
यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे ,सचिव लक्ष्मी नारायण राठी, अजय शहा, प्रफुल मालानी, तनसुख झांबड, जयंत देवळानकर, सरदार हरी सिंग, गुलाम हक्कानी, संतोष कावळे, स्वामी व इतर व्यापारी हजर होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘केंद्राचा कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी अडचणीचा, आम्ही दुसरा आणणार’
- ‘स्वप्निलची आत्महत्या नव्हे, हा तर ठाकरे सरकारने केलेला मर्डर आहे!’
- ‘..अन्यथा हेच तरूण तुमच्या गळ्याला फास लावतील’, राजू शेट्टींचा ठाकरे सरकारला इशारा
- ‘अधिवेशन कसे चालवायचे हे आता संज्या सांगणार, इतके खराब दिवस आलेत महाराष्ट्राचे’
- मुख्यमंत्री होऊ न देण्याचे ओवेसींचे आव्हान योगींनी स्वीकारले, म्हणाले..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
