🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळा यंदाच्या वर्षीही करोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर पायी वारीला परवानगी देण्यात आली नाहीये. यासोबतच, हा निर्णय संस्थानांनी नाईलाजाने स्विकारला असला तरी तो वारकरी संप्रदायाला मान्य नाही. वारकरी संप्रदायातील बंडातात्या कराडकर यांनी वारकऱ्यांनी पायी वारी करावी असं म्हटलं होतं.
राज्य सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले होते. यामुळे आता भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आषाढी वारीवरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘भागवत धर्माची पताका खाली ठेवायला सांगणं चुकीचं आहे. मोगलाई आणि निजाम काळातही असे झाले नव्हते’, अशा शब्दात फडणवीस यांनी वारीबाबतच्या निर्णयावर आक्षेप नोंदवलाय.
दरम्यान, काल शनिवारी फडणवीस यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. विठ्ठल-वारकरी यांचे नाते अवर्णनीय असते. श्रद्धा आणि परंपरांचे एक वेगळं महत्त्व आहे. वारकऱ्यांचा असा अपमान करणं चुकीचं आहे,’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. ‘बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारनं काय साधलं? काहीच मध्यम मार्ग नव्हता?,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ‘बंडातात्यांवर थेट अटकेची कारवाई करणं हे सर्वथा चुकीचं आहे. याच तीव्र निषेध करतो,’ असेही त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘स्वप्निलची आत्महत्या नव्हे, हा तर ठाकरे सरकारने केलेला मर्डर आहे!’
- ‘..अन्यथा हेच तरूण तुमच्या गळ्याला फास लावतील’, राजू शेट्टींचा ठाकरे सरकारला इशारा
- ‘अधिवेशन कसे चालवायचे हे आता संज्या सांगणार, इतके खराब दिवस आलेत महाराष्ट्राचे’
- मुख्यमंत्री होऊ न देण्याचे ओवेसींचे आव्हान योगींनी स्वीकारले, म्हणाले..
- ‘राज्याची चिंता असेल तर अधिवेशन चालू द्या, गोंधळ घालू नका’, खा.राऊतांचे विरोधकांना आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
