Share

LICची नवी योजना; एकावेळी प्रीमियम देऊन आयुष्यभर मिळवा 12 हजार रुपये

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: सध्या देशात कोरोनाचे संकट असल्याने अनेक बँकांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. यातच अनेक बँक आपल्या ग्रांह्कांसाठी विविध योजना उपलब्ध करत आहेत. यातच आता भारतीय जीवन विमा महामंडळा अर्थात LICने  १ जुलै २०२१ पासून सरल पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेत पॉलिसी सुरू होण्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर कधीही कर्ज घेता येते. हे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही वर उपलब्ध आहे.

LIC सरल पेन्शन योजना एक नॉन-लिंक्ड, सिंगल प्रीमियम, वैयक्तिक त्वरित एन्युइटी योजना आहे. ही योजना पती-पत्नीसमवेतही घेता येईल.  भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही एक मानक त्वरित एन्युइटी योजना आहे, जी सर्व जीवन विमाधारकांना समान अटी देते.

योजना कशी खरेदी करावी 

  • LIC ची नवीन सरल पेन्शन योजना ऑफलाइन किंवा http://www.licindia.in वेबसाइटवर ऑनलाइन खरेदी करता येऊ शकते.
  • योजनेअंतर्गतमिनिमम अ‍ॅन्युइटी १२ हजार रुपये प्रति वर्ष आहे.
  • किमान खरेदी किंमत एन्युइटी मोड, पर्याय निवडलेल्या आणि पॉलिसी घेणार्‍याचे वय यावर अवलंबून असते.
  • ही योजना ४० ते ८० वर्षे वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे.
  • मासिक पेन्शनसाठी तुम्हाला दरमहा १ हजार रुपये जमा करावे लागतील.

पॉलिसीधारकाला सिंगल प्रीमियम पेमेंटवर दोन पर्यायांपैकी अ‍ॅन्युइटी निवडण्याचा पर्याय

  • पॉलिसी होल्डरला आयुष्यभर पेन्शन मिळेल आणि त्याचा मृत्यू झाल्यात 100 टक्के सम अश्योर्ड नॉमिनीला देण्यात येईल.
  • पॉलिसीधारकाला आयुष्यभर पेन्शन मिळेल. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा जोडीदार, पती किंवा पत्नी यांना आयुष्यभर पेन्शन मिळेल. लास्ट सरव्हायवरच्या मृत्यूनंतर 100 टक्के सम अश्योर्ड नॉमिनीला देण्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!