Share

इन्स्टावर व्हायरल होणारं भूत आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; पहा व्हिडिओ

Published On: 

मुंबई : ९० च्या दशकापासुन बॉलीवूडवर आपल्या सौदंर्याची मोहीणी टाकणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी. तिने ‘बाजीगर’ चित्रपटाद्वारे पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटात शिल्पाला फिल्मफेअरची दोन नामांकने मिळाली. यानंतर पुढच्याच वर्षी अक्षय कुमार अभिनीत ‘मै खिलाडी तु अनाडी’ या चित्रपटाने शिल्पाने बॉलीवूडमध्ये आपला जम बसवला.

सध्या शिल्पा  छोट्या पडद्यावरील ‘सुपर डान्सर 4’ या शोमध्ये परीक्षकाची भूमिका साकारत आहे. मात्र यावेळी सेटवर ती एक खुपचं भयानक प्रॅन्क करताना दिसत आहे. ती वैभवसाठी भुताच्या रुपात अवतरणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून वैभवने अनेकदा भीती घातली आहे. याचा त्याला धडा शिकवण्यासाठी ती एक भयानक प्रॅन्क करणार आहे.

https://www.instagram.com/tv/CQv4bJ5hk14/?utm_source=ig_web_copy_link

नुकताच सोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘सुपर डान्स ४ ‘ चा प्रोमो रिलीज केला आहे. या व्हिडीओ मध्ये शिल्पा शेट्टी भुत होण्यासाठी मेकअप करत असते. हा मेकअप पाहून भल्या भल्यांना घाम फुटला आहे. या प्रोमोमध्ये शिल्पा शेट्टी भुत होण्यासाठी मेकअप करत असते. त्यावेळी ती मेकअपमन तिचा भयानक मेकअप करतो. त्यानंतर शिल्पा स्वतः ला आरशात पाहून घाबरते, इतका हा मेकअप भयानक वाटतं आहे. सध्या शिल्पाचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतं असून हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना घाम फुटला आहे.

२००७ साली आलेल्या अपने नंतर शिल्पाने चित्रपटातुन ब्रेक घेतला. यानंतर शिल्पाने उद्योजक राज कुंद्रा यांच्याशी लग्न केले. यानंतर शिल्पा अनेक रियालीटी शोच्या माध्यमातुन प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. ‘हंगामा २’ या चित्रपटाद्वारे ती पुन्हा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टी आणि परेश रावलसोबत राजपाल यादव, मिजान जाफरी, प्रणिता देखील पहायला मिळणार आहे. ‘हंगामा २ ‘ डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!