🕒 1 min read
मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात होण्याची शक्यता असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममधून कोणाला डच्चू मिळणार, कोणाचं खातं बदलणार आणि कोणत्या नवीन चेहऱ्यांची वर्णी लागणार, या प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसांत मिळण्याची शक्यता आहे. यात महाराष्ट्रातून नारायण राणे, उदयनराजे भोसले, प्रीतम मुंडे, हिना गावित ही नावे आधीपासून चर्चेत असताना माध्यमांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावांचीही चर्चा सुरू केली होती.
ही शक्यता स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावली आहे. मी महाराष्ट्राबाहेर जाण्याची कोणतीही शक्यता नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अशी चर्चा नेहमीच असते, परंतु आमच्या पक्षात आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी जो आदेश देतात तो सर्वांकरिता शिरोधार्य असतो. मात्र एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की भारतीय जनता पक्षाचे आणि महाराष्ट्राचे राजकारण ज्याला कळते त्याला हे लक्षात येईल की, मी महाराष्ट्रातून बाहेर जाण्याची कोणतीही शक्यता नाही. खरं म्हणजे जे माझे शुभचिंतक आहेत, त्यांना असं वाटतं की मला दिल्लीत काहीतरी मिळाले तर त्यांना आनंद होत आहे. त्यामुळे त्यांनाही सांगतो की माझी जाण्याची शक्यता नाही. आणि काही लोकांना वाटत आहे की हा दिल्लीला गेला तर बला टळेल, तर बला टळणार नाही, हेही ही मी स्पष्टपणे सांगतो.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना राज्यातून केंद्रात पाठवणं म्हणजे भाजपने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. एका अर्थाने फडणवीस केंद्रात जाणे म्हणजे त्यांचं प्रमोशन नसून डिमोशन असणार आहे. फडणवीस केंद्रात जाणार अशी चर्चा या सत्ताधारी मंडळीच जास्त करताना दिसून येतात. यामागे त्यांचे अनेक उद्देश असले तरीही भाजपमधील आमदारांना अस्वस्थ करणे हा देखील एक या मंडळींचा असतो म्हणूनच काही मोठ्या घडामोडी घडायला लागल्या की अशा बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जातात.
महाविकास आघाडीत धुसफूस सुरु आहे. सरकार किती दिवस चालेल याची शाश्वती नाही. अशा काळात फडणवीस जर केंद्रात गेले तर भाजप गाफील राहील अशी स्थिती आहे. भाजपचे काही आमदार देखील फुटू शकतात. येत्या काळात नवी मुंबई, मुंबई तसंच इतर महापालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत. मागील निवडणुकांमध्ये याठिकाणी भाजपला चांगली कामगिरी करायची असेल तर राज्यात फडणवीस यांच्यासारखा खमका नेता असणे काळाची गरज आहे. त्यामुळे सध्यातरी ते केंद्रात जातील अशी शक्यता नाही.
जर राज्याच्या राजकारणाचा दांडगा अभ्यास असणाऱ्या फडणवीस यांना केंद्रात बोलावले तर मग महाविकास आघाडीला रान मोकळे करून दिल्यासारखे होणार आहे यामुळेच फडणवीस हे केंद्रात जातील अशी शक्यता नाही. केंद्राचा जर विचार करायचा झाल्यास भाजपकडे विद्वान नेत्यांचा दुष्काळ वगेरे पडला आहे अशी स्थिती नाही. एकाहून एक असे महारथी मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत त्यामुळे फडणविसांच्या वाचून केंद्राचे काही अडणार नाही अशी सध्या स्थिती असल्यानेच त्यांना केंद्रात बोलावले जाणार नाही हेच सध्यातरी दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शुभमनची दुखापत गंभीर ; ‘एवढे’ दिवस रहावे लागणार मैदानाबाहेर
- क्वारंटाईनमधून बाहेर येताच भारतीय खेळाडूंची पूल पार्टी ; फोटो होतोय व्हायरल
- पिंपरी-चिंचवडमध्ये आता पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे ! जाणून घ्या किती आहे रक्कम
- ‘राष्ट्रवादीच्या कार्यालयावरील दगडफेकीला योग्य उत्तर दिलं जाईल, भाजपसाठी ही धोक्याची घंटा’
- ‘शरद पवार कृषी तज्ज्ञ, कृषीमंत्री राहिले तरी शेतकरी समाधानी का नाहीत?’, निलेश राणेंचा प्रश्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
