Share

महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’? शाह-फडणवीस यांच्या भेटीमागे दडलंय काय?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये गुप्त बैठकीची चर्चा सुरू आहे. तर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे या दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. महत्त्वाचे म्हणजे या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फडणवीस यांच्यासोबत फोनवर चर्चा केल्याचे समजते.

फडणवीस-मोदी आणि अमित शाह यांची २० मिनिटे चर्चा झाली. विशेष म्हणजे या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात आले आणि त्यानंतर राज्यातील भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला मोजके आणि महत्त्वाचे भाजप नेते उपस्थित होते. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’ सक्रिय झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, राज्यातून आणखीन एक घडामोड समोर आली आहे. महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे वारंवार समोर येत आहे. संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता नवी माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही मंगळवारी गुप्त बैठक झाली. या बैठकीला संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार, मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, एकनाथ शिंदे या उपस्थित होते. या बैठकीत काय चर्चा झाली याचा तपशील मात्र समजू शकला नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!