🕒 1 min read
मुंबई : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात बुधवारी सायंकाळी दगडफेक करण्यात आली आहे. तत्पूर्वी सकाळी त्यांनी सोलापूर येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. ते मोठे नेते आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोणी तसं मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे,’ अशी बोचरी टीका पडळकर यांनी केली होती.
तसेच ‘तीन खासदार अन साडेतीन जिल्ह्याचा पक्ष असणाऱ्या ‘भावी’ पंतप्रधान शरद पवार यांना पुढील तीस वर्षांच्या ‘भावी’ पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा आहेत’ अशी कोपरखळी त्यांनी मारली. मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी प्रधानमंत्री आहेत, त्यांना भावी प्रधानमंत्रीपदासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. पुढं कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा आहे, असा चिमटाही पडळकर यांनी पवारांना काढला.
यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पडळकरांवर बोचरी टीका केली आहे. ‘बातमीत राहायचे असेल शरद पवारांबद्दल खालच्या पातळीत बोलावे लागते, म्हणून टीका होत असल्याचा टोला आव्हाडांनी लगावला.
महाराष्ट्राच्या राजकारणात हे सर्वश्रूत आहे कि, जोपर्यं शरदचंद्रजी पवार साहेबांवरती खालच्या पातळीवर आपण टिका करत नाही तोपर्यंत मीडिया आपली दखल घेणार नाही. आपल्याला बातमीत राहायचे असेल तर बाकी काही बोलला नाही तरी चालेल पण श्री. शरद पवार साहेबांबद्दल खालच्या पातळीत बोला काम झाले
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 30, 2021
महाराष्ट्राच्या राजकारणात हे सर्वश्रूत आहे की, जोपर्यंत शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर आपण टीका करत नाही. तोपर्यंत मीडिया आपली दखल घेणार नाही. आपल्याला बातमीत राहायचे असेल तर बाकी काही बोलले नाही तरी चालेल. पण, शरद पवार यांच्याबद्दल खालच्या पातळीत बोला. काम झालेच म्हणून समजा’ असे ट्विटही आव्हाड यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शोषित-वंचित घटकांचा प्रतिनिधी म्हणवणाऱ्या पडळकरांकडे ५० लाखांची गाडी कशी?’
- ‘चपटी लावलेली असली की लोक हत्तीलाही मुंगी समजतात’, आव्हाडांचा पडळकरांवर निशाणा
- ‘अपयश झाकण्यासाठी भुजबळ आणि वडेट्टीवारांकडून खोटारडेपणा सुरू’, आ.अतुल सावेंचा आरोप
- ‘गाडीवर हल्ला झाल्याने राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर’, पडळकरांची टीका
- हॉटेलमध्येच कृणाल पांड्याने सुरु केला सराव, म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
