अमरावती : नांदगाव पेठ येथून जवळच असलेल्या रामगाव ते टाकळी मार्गावर एका युवकाने कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी पहाटे सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अनुभव अरुण धाकडे (३२, रा. मातोश्री रमाबाई आंबेडकरनगर, अमरावती) असे मृताचे नाव आहे. जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रेयसीने दुसऱ्या मुलासोबत साखरपुडा केल्यामुळे प्रियकर अनुभव याने टोकाचे पाऊल उचलले. या तरुणाने आत्महत्या पूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवाय एक व्हिडिओ सुद्धा बनवून त्याने सोशल मीडियावर व्हायरल केल्याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, अनुभवचे परिसरातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. तो गेल्या चार ते पाच वर्षांपासून तिला ओळख होता. तेव्हापासून नेहमी हे दोघे रहाटगावनजीक असलेला शेतात भेटत होते. त्यांनी एकमेकांनना लग्नाचे वचनही दिले होते. ते लग्न सुद्धा करणार होते. मात्र अचानक आपल्या प्रेयसीनी साखरपुडा केल्याची माहिती या युवकाला समजल्याने तो दु:खी झाला.
त्यानंतर त्याने ज्याठिकाणी झाडाखाली ते रोज भेटायचे त्याच ठिकाणी त्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आणि आपली जीवनयात्रा कायमची संपवली. चिठ्ठीत माझ्या आत्महत्येला माझी प्रेयसी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, अनुभव याच्यावर गाडगेनगर पोलीस ठाण्यात अनुभव याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल होता, अशी माहितीदेखील मिळाली.
चिठ्ठीत काय लिहिले?
‘त्या रात्री माझ्या घरचे झोपल्यानंतर तू मला येऊन भेटली. तेव्हा तू मला घट्ट मिठी मारून रडत होतीस. तेव्हा मी तुला सोडून समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु तरीही तू समजत नव्हती. तुझा साखरपुडा होण्याच्या आधी मी तुझ्या पप्पांना फोन करून सर्व सांगितले होते. परंतु तुझे पप्पा तुला फाशी द्यायची धमकी देऊन तुझा विचार बदलला. त्यानंतर माझ्यावर बलात्काराची केस करणार होते. परंतु तू फक्त माझ्या पैशाचा आणि माझ्या मनाचा वापर केला. मला न्याय हवा. मला मुलीची बदनामी नाही करायची बस…’ असा मजकूर चिठ्ठीत लिहिण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘इंधनाचे भाव वाढत आहेत तर मग सायकल वापरा!’, ऊर्जामंत्र्यांनी सांगितला अजब उपाय
- मोदी सरकारशी पंगा अंगलट! ट्विटरवर पॉक्सो, आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात बीडच्या इरफान शेखला दिल्लीत अटक
- ग्रामविकास निधीवर डल्ला; डेप्युटी सीईओला ७ वर्षे सश्रम कारावास
- मारहाण झालेल्या रिक्षाचालकाची शिवसेना आ.दानवे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
