🕒 1 min read
नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी जारी केलेल्या नव्या नियमावलीचं पालन न केल्यामुळे ट्विटरला असलेले कायदेविषयक संरक्षण हटवण्यात आले आहे. त्यामुळे ट्विटरला मोठ्या प्रमाणावर समस्यांचा सामना करावा लागतोय. नुकतंच भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दर्शवल्याप्रकरणी ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष माहेश्वरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. यानंतर आता अजून एका प्रकरणात ट्विटरविरोधात दिल्लीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशतील गाझियाबाद आणि बुलंदशहर नंतर आता दिल्लीमध्ये ट्विटरविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे. चाईल्ड पॉर्नोग्राफीविरोधात ट्विटरवर पॉक्सो कायद्यांतर्गत आणि नव्या आयटी कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Delhi Police Cyber Cell has registered case under POCSO Act & IT Act against Twitter on the basis of a complaint from NCPCR citing availability of links/material pertaining to child exploitation. Complaint is against Twitter Inc & Twitter Communication India Pvt Ltd: Delhi Police
— ANI (@ANI) June 29, 2021
दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चाईल्ड पॉर्नोग्राफी कंटेट वापल्याप्रकरणी ट्विटरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडून (NCPCR) दाखल तक्रारीवरुन ट्विटरविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चुकीचा नकाशा हटवला
ट्विटर इंडियाचे MD मनीष माहेश्वरी यांच्याविरूद्ध उत्तर प्रदेशमध्ये आणखी एक एफआयआर नोंदवण्यात आला आहे. ट्विटरच्या संकेतस्थळावर भारताचा चुकीचा नकाशा दाखविल्याबद्दल बुलंदशहरमध्ये केस दाखल करण्यात आली आहे. हा वाद वाढत असल्याचे पाहून ट्विटरने सोमवारी आपली चूक सुधारली. परंतु यापूर्वी दर्शवलेल्या नकाशामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांना भारतापासून वेगळे दाखवण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात बीडच्या इरफान शेखला दिल्लीत अटक
- ग्रामविकास निधीवर डल्ला; डेप्युटी सीईओला ७ वर्षे सश्रम कारावास
- मारहाण झालेल्या रिक्षाचालकाची शिवसेना आ.दानवे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार
- पीकविमा देण्यास टाळाटाळ; विमा कंपनीसह केंद्र, राज्य सरकारला खंडपीठाची नोटीस
- मित्राच्या वाढदिवसाला डीजेच्या तालावर डान्स; ९ जणांवर गुन्हा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
