नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बेकायदा धर्मांतर प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर आलेलं आहे. उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी रात्री बेकायदा धर्मांतर प्रकरणी आणखी तिघांना अटक केली आहे. यामध्ये बीडमधील एका आरोपीचा समावेश आहे. प्रलोभने दाखवून जबरदस्तीने धर्मांतर करणे भाग पाडणाऱ्या टोळीच्या कारवाया उघडकीस आणल्या होत्या. याआधी उमर गौतम आणि जहाँगीर आलम यांना अटक करण्यात आली होती. सोमवारी यात आणखी तिघांची भर पडली आहे.
बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी अटकेत असलेला इरफान शेख हा मुळचा सिरसाळा(ता.परळी, जि.बीड) येथील रहिवासी असल्याने या प्रकरणाचे धागेदोरेही थेट बीडपर्यंत पोहोचल्याने खळबळ उडाली. या वृत्ताने शेख यांच्या नातेवाईकांनाही धक्का बसला. सिरसाळा येथेच त्याचे बालपण गेले असून वडिलांचे निधन झाले आहेत, तर अन्य तीन भावांपैकी दोघं गावात व एक परळीमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे.
इरफान शेख हा दिल्लीतील मिनिस्टरी ऑफ चाईल्ड वेलफेअरमध्ये इंटर प्रिपेटर म्हणून काम करत होता. मागील काही वर्षांपासून तो दिल्लीतच वास्तव्यास असल्याने गावाशी त्याचा फारसा संपर्क नाही. बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात इरफानला अटक झाल्याने नातेवाईकांना धक्का बसला आहे.
इरफानचे वडील खाजा शेख हे बसचालक होते. काही दिवसापूर्वी त्यांचे निधन झाले. अन्य तीन भाऊ असुन दोघे सिरसाळ्यात तर एक परळीमध्ये वास्तव्यास आहे. पाच ते सहा वर्षांपासून इरफान शेख दिल्लीला असल्याचे सांगितले जाते. तो मुकबधिर नागरिकांसाठी काम करत आहे एवढेच आम्हाला माहित होते असे ग्रामस्थांनी सांगितले. इरफान शेख हा विवाहित असुन त्याला दोन मुलं आहेत. सासरवाडी परळीतीलच असुन सासरे एका शाळेवर शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेरोजगार, गरीब कुटुंब आणि मूक बधिर लोकांचे धर्मांतरण करण्यात येत होते. याप्रकरणी यूपी एटीएसने दोन आरोपींना दिल्लीतून अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांना लाच देऊन त्यांचे धर्मांतरण करण्यात येत होते. धक्कादायक बाब म्हणजे, या धर्मांतरणासाठी आयएसआय फंडिंगचे प्रकरणही समोर आले आहे. कतार, अबुधाबी आणि रियाध येथून आतापर्यंत 50 लाख रुपयांची देवाण घेवाण केल्याचं समोर आलं. “आरोपी उमर गौतम याने परदेशातून पैसे मिळवताना आपलं खासगी तसंच कुटुंबाच्या बँक खात्याचा वापर केला आहे. हे स्पष्टपणे परदेशी चलन नियमन कायद्याचं उल्लंघन आहे,” अशी माहिती प्रशांत कुमार यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ग्रामविकास निधीवर डल्ला; डेप्युटी सीईओला ७ वर्षे सश्रम कारावास
- मारहाण झालेल्या रिक्षाचालकाची शिवसेना आ.दानवे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार
- पीकविमा देण्यास टाळाटाळ; विमा कंपनीसह केंद्र, राज्य सरकारला खंडपीठाची नोटीस
- मित्राच्या वाढदिवसाला डीजेच्या तालावर डान्स; ९ जणांवर गुन्हा
- ‘मराठा आरक्षणाचा मुद्दा मीच लोकसभेत सर्वप्रथम मांडला’, भाजप खा.प्रीतम मुंडेंचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
