Share

‘इंधनाचे भाव वाढत आहेत तर मग सायकल वापरा!’, ऊर्जामंत्र्यांनी सांगितला अजब उपाय

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशातील इंधन दरवाढीने महागाईचा आगडोंब उसळला आहे. मे महिन्यात घाऊक आणि किरकोळ महागाई मोठ्या प्रमाणात वाढली होती. इंधन दरवाढीने बहुतांश शहरात पेट्रोल शंभर रुपयांवर गेले आहे. इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर चौफेर टीका केली जात आहे.

गेल्या तीन महिन्यांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिरावल्या होत्या. पण आता हळूहळू इंधन दरवाढ होत असताना पाहायला मिळत आहे. देशातील पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर लगेचच इंधन दरवाढीला वेग आल्याचं दिसून येत आहे. मागच्या एका महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल 16 वेळा वाढ करण्यात आली आहे.

याच दरम्यान मध्य प्रदेशचे भाजप नेते तथा ऊर्जामंत्री प्रद्युम्नसिंग तोमर यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींबाबत जनतेला काही अजब सूचना दिल्यात. तोमर यांनी इंधन दरवाढीवर एक विचित्र उपाय सांगितला आहे.

उर्जा मंत्री तोमर यांनी म्हटले की, ‘पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले तर काय झाले? बाजारात भाजी आणायला जाताना कधी आपण सायकल वापरतो का? ज्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. आपल्याला पेट्रोल डिझेल महत्त्वाचे आहे की आरोग्य आणि देशाचे हित महत्त्वाचे आहे?’ असा सवाल त्यांनी विचारला आहे. शिवाय पेट्रोल आणि डिझेलमधून येणारा नफा नागरिकांच्या उपचारासाठी खर्च केला जात आहे असा दावाही त्यांनी केलाय. त्यांच्या या अजब उपायाची नेटकरी खिल्ली उडवत आहेत.

दरम्यान, पाच राज्यांतील निवडणुका संपल्यानंतर लगेचच संपूर्ण देशात इंधन दरवाढीचा भडका उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जवळपास ५६ दिवस निवडणुकांचे बिगुल वाजताच इंधन दरवाढ थांबवण्यात आली होती. यामुळे तेल कंपन्यांवर मोठा आर्थिक बोजा पडला होता. ती आर्थिक तूट आता भरून काढण्याचा प्रयत्न तेल कंपन्या करत असल्याचं काही तज्ज्ञांनी बोलून दाखवलं. त्यामुळे सरकार नेमका इंधन दरवाढीवर निर्णय घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!