Share

मारहाण झालेल्या रिक्षाचालकाची शिवसेना आ.दानवे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : सोमवारी (दि.२८) औरंगाबादच्या क्रांती चौकात वाहतूक कोंडी झाली होती. ती तोडण्यासाठी पोलिसांबरोबर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे रस्त्यावर उतरले होते. एक रिक्षाचालक वाहतूक नियम तोडून मधेच घुसल्याने दानवे यांनी त्याच्या कानशिलात लगावली. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

आता या प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे. आमदार दानलले यांनी मारहाण केल्याप्रकरणी त्या रिक्षाचालकाने क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चुकी नसतानाही आमदार दानवेंनी पोलिसांसमोर मारहाण केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून माझी बदनामी झाली आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी रिक्षाचालकाने केली आहे. याबाबत त्याने पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांच्याकडेही तक्रार दिली आहे. अजय अशोक जाधव (रा.वेदांतनगर, व्यंकटेश कॉलनी, उस्मानपुरा) असे त्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

काय आहे नेमका प्रकार?
पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी सकाळी शहरात दुपारी चारनंतर लॉकडाऊन होणार असल्याची घोषणा केली. त्याची माहिती शहरातील नागरिकांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. चार वाजेनंतर लॉकडाऊन लागण्याची भिती असल्यामुळे वाहन चालकांनी घर गाठण्यासाठी घाई सुरू केली. क्रांतीचौकात वाहनांची मोठी रांग असल्याचे पाहून खुद्द आमदार दानवे वाहतुकीचे नियमन करण्यासाठी रस्त्यावर उतरले. अदालत रोडकडून क्रांतीचौकात येणाऱ्या वाहनांनी मोठी गर्दी केली होती. तर सिल्लेखाना चौकातून क्रांतीचौकाकडे येत असलेल्या रस्त्याच्या सिग्नलवर आमदार दानवे कार्यकर्त्यांसह उभे होते.

यावेळी वाहतुकीचे नियमन करत असतानाच एक रिक्षा चालक जात होता. त्याला पाहून आमदार दानवे यांचा संताप अनावर झाला. या रिक्षा चालकाला थांबवत आमदार दानवे यांनी भररस्त्यात रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावली. तसेच शिवीगाळ करुन त्याला तेथून लगेचच निघून जाण्यास सांगितले. हा प्रकार वाहतुक पोलिसांसमोरच सुरू होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काय म्हटले आहे तक्रारीत?
रिक्षाचालक अजय जाधव याने दिलेल्या तक्रारीनूसार, तो मित्राचा रिक्षा घेऊन शहागंज, मोंढा येथे किराणा सामान आणि भाजीपाला आणण्यासाठी जात होता. पण आमदार दानवे यांनी काही एक चूक नसताना मला शिविगाळ आणि मारहाण केली. मी त्यांना माझी चूक काय असे विचारत होता. त्यावेळी त्यांच्यासोबत पोलीस कर्मचारीही होते.

पोलिसांसमोर मला मारहाण झाली आणि दानवेंच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळही केली. तसेच त्याचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे समाजात माझी बदनामी झाली आहे. या घटनेचा माझ्या कुटुंबीयांना त्रास होत आहे. त्यामुळे आमदार दानवे यांच्यावर कारवाई करून मला न्याय मिळवून द्यावा अशी तक्रार रिक्षाचालक अजय जाधव याने केली आहे.

आमदार असलो तरी आधी शिवसैनिक’
दरम्यान, रिक्षाचालकाला मारहाण केल्यानंतर दानवे यांनी प्रतिक्रिया दिली होती. ‘वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांसह मी आणि शिवसैनिक प्रयत्न कलरत होतो. त्यावेळी एक बेशिस्त रिक्षाचालक मध्येच घुसला. त्यामुळे त्याला शिस्त शिकवण्याचा प्रयत्न आपण केला. मी आमदार आहे, पण आधी मी एक शिवसैनिक आहे. त्या रिक्षाचालकाचा बेशिस्तपणा पाहून माझ्यातला शिवसैनिक जागा झाला होता’, अशा शब्दात दानवे यांनी रिक्षाचालकाला फटकावल्याचे समर्थन केले होते. आता तक्रार दाखल झाल्याने दानवेंसमोर अडचण निर्माण झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!