Share

‘स्थानिक स्वराज्य संस्था एकत्रित लढवण्याचा प्रयत्न’, जयंत पाटील यांची माहिती

Published On: 

हिंगोली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रित लढवण्याचे प्रयत्न आहेत. पण स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊनच त्या संदर्भातील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी हिंगोली येथे पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, राज्यात डेल्टा पल्सचे रुग्ण वाढत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची परिसंवाद यात्रा थांबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पाटील म्हणाले की, निवडणुकीच्या वेळीच याबाबत निर्णय घेतला जाईल. मराठवाड्यातील प्रकल्पांमधून पाणी वहन क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे प्रकल्प व कालव्यांमधून गाळ काढणे व इतर दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांची उपस्थिती होती.

हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुर्णा नदीवर उच्च पातळीचे बंधारे बांधून त्यात सिध्देश्वरचे पाणी उपलब्ध करून सिंचनाचा प्रश्न सोडविता येईल या बाबत संबधित विभागा सोबत चर्चा झाली असल्याची माहिती पाटील यांनी दिली. हिंगोली जिल्हातील अनुशेष भरून काढण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी यासाठी प्रयत्नशील असुन आठ दिवसांत हा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात चार लाख हेक्टर क्षेत्र लागवडीचे आहे. त्यापैकी ५३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचन करता येणार आहे. उरलेले पाणी खर्च केल्यास ८४ हजार हेक्टर सिंचन होणार आहे. उपलब्ध पाणी साठ्याचा उपयोग करता येईल असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!