Share

औरंगाबादेत पुन्हा एकदा लसीकरण संकटात! सायंकाळपर्यंत लसींचा साठा येण्याची शक्यता

Published On: 

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी औरंगाबादकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र आता पुन्हा एकदा लसींच्या तुटवड्याचे संकट समोर उभे राहिले आहे. आता महापालिकेकडे केवळ ५५० लस शिल्लक आहेत. त्यामुळे शहरातील जवळपास ७७ लसीकरण केंद्र तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत. आज केवळ प्रोझोन मॉल याठिकाणी ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन तर कोवॅक्सिनचा दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी तीन केंद्र सुरु राहणार आहेत.

आज लसींचा पुरवठा होण्याची शक्यता असल्याची माहिती लसीकरण अधिकारी स्मिता नळगिरकर यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना दिली. तसेच महापालिकेने शासनाकडे १ लाख लसींची मागणी केली असल्याचे देखील त्यांनी सांगितले. शनिवारी सुमारे दोन हजार लसी शिल्लक होत्या. रविवारी (दि.२७) मनपाला १२ हजार लसींचा साठा मिळाला होता. यामधून सोमवारी (दि.२८) १५ हजार ३९६ जणांचे लसीकरण करण्यात आले. मात्र आता केवळ ५५० लसींचा साठा शिल्लक आहे. आज लसींचा साठा मिळण्याची शक्यता असल्याचे लसीकरण अधिकाऱ्यांनी सांगितले.

मात्र जर आज साठा आला नाही तर लसीकरण बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २२ जूनपासून शहरात १८ प्लस लसीकरणाला जोरदार सुरुवात झाली. पाचच दिवसात ६० हजार जणांचे लसीकरण करण्याचा टप्पा मनपाने ओलांडला. सर्वच ठिकाणी तरुणांचा जोरदार प्रतिसाद मिळत होता. मात्र आता पुन्हा एकदा लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन अंतर्गत प्रोझोन याठिकाणी सुरु राहणार आहे. तर कोवॅक्सिनचे आता केवळ दुसऱ्या डोससाठी राखीव आहे. त्यामुळे आज सर्वच लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!