Share

‘तिच्यामुळे माझं आयुष्य आणखी सुंदर बनलंय’ ; अर्जुनने मलायकासाठी लिहिली भावूक पोस्ट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूडमध्ये काही असे कपल आहेत ज्यांची चर्चा नेहमीच होते. त्यामध्ये अभिनेत्री मलायका अरोरा आणि बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर यांची नेहमीच चर्चा असते. अनेक कलाकारांचे अफेयर्स हा बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त चर्चा केला जाणारा विषय. बॉलीवूडमध्ये सध्या अर्जुन कपुर आणि मलायका आरोरा ही जोडी सध्या हॉट कपल म्हणून ओळखली जाते. सध्या मलायका आणि अर्जुन रिलेशनशिप मध्ये आहेत.

१८ वर्षाच्या संसारानंतर मलायका आणि अभिनेता अरबाज खानने २०१७मध्ये घटस्फोट घेतला. त्यांना एक मुलगा देखील आहे. आता मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. २०१९मध्ये अर्जुनने मलायकाला डेट करत असल्याची कबुली दिली. अर्जून आणि मलायका दोघेही लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचे सांगितले जात आहे.

नुकताच अर्जुन कपूरने आपला ३६वा वाढदिवस साजरा करतो आहे. या निमित्ताने गर्लफ्रेंड मलायका अरोरा हिने देखील सोशल मीडियावर त्या दोघांचा रोमँटिक फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या फॅन्सच्या कमेंट्सचा वर्षाव सुरूच होता. सगळ्यांकडून मिळत असलेलं इतकं प्रेम पाहून अभिनेता अर्जुन कपूर भावूक झाला. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून त्याने त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी शेअर केल्या. त्याच्या या इमोशनल पोस्टमध्ये त्याने गर्लफ्रेंड मलायकाचा देखील उल्लेख केला.

अर्जुन कपूनने पोस्ट शेअर करत लिहिले, “बर्थ डे सेलिब्रेशन दरम्यान एक विचार मनात आला. एका वर्षात किती काय काय बदल होतो, एक वर्षापूर्वी मी पूर्णपणे निराश-हताश, थकलेला आणि भ्रमित होतो, पण आज मी नवी उर्जा, दृढ संकल्प मनात ठेवून कोणत्याही अडचणीचा सामना करण्यासाठी तयार आहे. आज मला त्या सर्व जणांचे आभार मानायचे आहेत, ज्यांनी कायम माझ्यावर विश्वास ठेवला आणि कायम माझ्या अडचणीच्या प्रसंगी माझी साथ दिली. माझी काळजी घेतली.”

https://www.instagram.com/p/CQqLPnMr27W/?utm_source=ig_web_copy_link

अर्जुनने या पोस्टमध्ये मलायकाचा देखील उल्लेख केला आहे. यात त्याने लिहिलं, “माझा हा फोटो मलायका अरोराने क्लिक केलाय…ती माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा हिस्सा आहे आणि तिच्यामुळे माझं आयुष्य आणखी सुंदर बनलंय.” अर्जुनच्या या पोस्टवर त्याचे फॅन्स कमेंट्स करताना दिसून येत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!