🕒 1 min read
मुंबई : कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे Coronavirus Delta Plus Variant सरकारची चिंता अधिक वाढली आहे. देशातील बर्याच राज्यामध्ये या व्हायरसचं आगमन झालं आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी केंद्र सरकारची चिंता अधिक वाढली आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, तसेच मध्यप्रदेशसह 12 राज्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट बाधित ५० हुन अधिक रुग्ण आढळले आहेत. डेल्टा प्लस हा व्हेरियंट डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत कित्येक पटीने वेगाने पसरतो. या विषाणूवर मात करण्यासाठी सरकारने लसीकरण मोहिमेचा वेग वाढवला आहे.
दरम्यान महाराष्ट्रात आज १०,८१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ५८,००,९२५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९९% एवढे झाले आहे.
आज राज्यात ६,७२७ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज १०१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,१२,०८,३६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,४३,५४८ (१४.६५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,१५,८३९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,२४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- जायकवाडीतून १ टिएमसी पाणी वॉटरग्रीड योजनेसाठी घेतल्यास शेती सिंचनाला फरक पडणार नाही- संदीपान भुमरे
- वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या भाजप खा.साक्षी महाराजांची फसवणूक
- अॅथलेटिक्स ट्रॅकवर नेत्यांच्या गाड्या, पवारांच्या प्रकृतीच्या कारणाचा केदारांनी केला ढालीसारखा वापर
- ‘दलितांच्या मतांवर आरपीयचाही हक्क’ ; उत्तरप्रदेशात भाजपकडे केली ‘इतक्या’ जागांची मागणी
- पंजाबमध्ये ‘आप’ जिंकल्यास नागरिकांना मोफत वीज देणार; केजरीवालांची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
