नवी दिल्ली : भाजप खासदार साक्षी महाराज हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. त्यांची मोठी फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साक्षी महाराज यांच्या बँक खात्यातून आरोपींनी रक्कम काढल्याची घटना घडली आहे.
दोन बनावट चेकद्वारे ठगांनी खासदारांच्या बँक खात्यातून ९७ हजार ५०० रुपये काढून घेतले. नवी दिल्लीचे पोलीस उपअधीक्षक दीपक यादव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, याप्रकरणी निहाल सिंह आणि दिनेश राय नावाच्या आरोपींना बिहारमधून अटक करण्यात आली आहे. एक हजाराहून अधिक लोकांच्या बँक खात्यातून कोट्यवधी रुपये काढून घेतल्याचे आरोपींनी चौकशी दरम्यान उघड केले आहे.
खासदार साक्षी महाराज यांनी या प्रकरणी संसद मार्ग पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली होती. कोणीतरी त्यांच्या एसबीआय बँक खात्यातून दोन बनावट धनादेशासह ९७ हजार ५०० रुपये काढून घेतल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते.
पोलिसांनी एसबीआय बँकेतून माहिती काढली असता, आरोपींनी खासदार साक्षी महाराज यांच्या बँक खात्याला तीन बनावट चेक लावले होते. दिनेश राय निहाल याला बनावट चेक देत असत. हे चेक वेगवेगळ्या बँकांमध्ये जमा करून ते पैसे काढायले. या कामासाठी त्याला फसवणूक झालेल्या रकमेच्या ३० टक्के कमिशन मिळायचे.
महत्वाच्या बातम्या
- पंजाबमध्ये ‘आप’ जिंकल्यास नागरिकांना मोफत वीज देणार; केजरीवालांची घोषणा
- चीनविरोधात भारत आक्रमक! सीमेवर ५० हजार अतिरिक्त सैन्यबळ तैनात
- लसीकरणात भारत अमेरिकेच्याही पुढे, मोदींनी केले अभिनंदन
- ‘केंद्राने इंधनावरील देशवासियांकडून कर म्हणून तब्बल ४ लाख कोटी उकळले’
- ‘फडणवीसांवर विश्वास कसा ठेवणार? त्यांनी ‘या’ दोन भीष्मप्रतिज्ञा मोडल्यात!’, खडसेंचा हल्लाबोल


