🕒 1 min read
मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे पडघम आता वाजू लागले आहेत. केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपाकडे 8 ते 10 जागांची मागणी केली आहे. आठवलेंनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेऊन आगामी पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांवर चर्चा केली.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटकपक्ष या नात्यानं आठवलेंनी या राज्यांमध्ये विधानसभा जागांची मागणी भाजपाकडे केली आहे. त्यांनी सर्वात जास्त 8 ते 10 जागा उत्तर प्रदेशात मागितल्या आहेत. तर उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर राज्यात 2 ते 3 जांगाची मागणी केली आहे. दलितांच्या मतांवर आरपीयआयचाही हक्क आहे, असे मत यावेळी रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. तसेच रिपब्लिकन पक्षाचा प्रत्येक राज्यात जनाधार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. म्हणून त्यांनी भाजपकडे आगामी निवडणुकीसाठी जागा मागितल्या आहेत.
AIMIM 100 सीटों पर लड़ रहा है तो मेरा निवेदन है कि उन्हें 200 सीटों पर लड़ना चाहिए। AIMIM के लड़ने से भाजपा और एनडीए का नुकसान नहीं है: केंद्रीय मंत्री रामदास अठावले
— ANI_HindiNews (@AHindinews) June 28, 2021
उत्तर प्रदेशमध्ये बसपची मतं खाल्ल्यास भाजपलाच फायदा होईल, दलितांच्या मतांवर आरपीयचाही हक्क असल्याचे आठवले यांनी नमूद केले. नड्डा यांनी जागावाटपाबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आठवले यांनी सांगितले.असादुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम पक्ष उत्तर प्रदेशमध्ये 100 जागांवर निवडणूक लढवणार आहे. त्यांनी 200 जागांवर निवडणूक लढवावी असे मत आठवले यांनी व्यक्त केले आहे. तसेच एमआयएमने उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवल्यास भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला कुठलेही नुकसान पोहोचणार नाही असा दावाही आठवले यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पंजाबमध्ये ‘आप’ जिंकल्यास नागरिकांना मोफत वीज देणार; केजरीवालांची घोषणा
- लसीकरणात भारत अमेरिकेच्याही पुढे, मोदींनी केले अभिनंदन
- ‘केंद्राने इंधनावरील देशवासियांकडून कर म्हणून तब्बल ४ लाख कोटी उकळले’
- ‘फडणवीसांवर विश्वास कसा ठेवणार? त्यांनी ‘या’ दोन भीष्मप्रतिज्ञा मोडल्यात!’, खडसेंचा हल्लाबोल
- स्वतंत्र विदर्भा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
