Share

पंजाबमध्ये ‘आप’ जिंकल्यास नागरिकांना मोफत वीज देणार; केजरीवालांची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे सध्या लोकप्रिय घोषणा करत आहेत. आपचा पंजाबमधील मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार शीख असेल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतेच जाहीर केले आहे. त्यानंतर मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी आणखीन एक आश्वासन दिले आहे. पंजाबमध्ये ‘आप’ जिंकल्यास नागरिकांना मोफत वीज पुरवण्यात येईल असे ते म्हणालेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल उद्या मंगळवारी चंडीगढला भेट देणार आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी पंजाबी भाषेत ट्विट केले आहे. त्यांनी महागाईमुळे पंजाबमधील महिलांनी आनंद गमावल्याचा दावा केला. ‘दिल्लीत आम्ही प्रत्येक कुटुंबाला दोनशे युनिट वीज मोफत देतो. त्यामुळे महिला आनंदात आहेत. आपचे सरकार आल्यास ते पंजाबमध्ये वीज मोफत पुरवेल. उद्या तुमची भेट घेण्यास मी आतुर आहे’ असे ट्विट केजरीवाल यांनी केले.

मोदींच्या गुजरातवरही केजरीवालांची नजर
दिल्लीच्या यशस्वी राजकारणानंतर आम आदमी पार्टी आता गुजरात विधानसभेच्या निवडणूक मैदानात पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. रविवारी गुजरातच्या राजकारणात आणखी एक ट्विस्ट आला. सूरत येथील हिऱ्याचे व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते महेश सवानी यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. गुजरातच्या सत्ताधारी भाजपाला हरवण्याचे उद्दिष्ट ठेऊन वाटचाल करणाऱ्या आम आदमी पक्षाला मोठं यश मिळालं आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!