पैठण : पैठण तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासाठी १०५ टिएमसी जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणातून १ टिएमसी पाणी वॉटरग्रीड योजनेसाठी घेतल्यास या ठिकाणी शेती सिंचनाला काहीच फरक पडणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे फलोत्पादन व रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांनी केले. पैठण येथील ४ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पैठण पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण करुन भुमरे यांच्या हस्ते शहराला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या दोन जलकुंभांचे भुमिपुजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
संदीपान भुमरे व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सोमवारी (दि.२८) पैठण पंचायात समितीच्या प्रशासकीय ईमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी बोलताना संदीपान भुमरे म्हणाले की, पंचायत समितीची भव्य इमारत उभी राहिली आहे. यासाठी तत्कालीन जिल्हा परिषद सभापती विलास भुमरे यांनी विशेष प्रयत्न केले. फर्निचर व अन्य साहित्यासाठी लाखो रुपये उपलब्ध करून दिले आहेत.
यावेळी जि.प.चे माजी सभापती विलास भुमरे आपल्या प्रस्ताविक भाषणात भुमरे यांना उद्देशून म्हणाले की, आपण तालुक्यासाठी, राज्यासाठी काम करा विरोधक काय बोलतात, त्याकडे लक्ष देऊ नका, वेळ प्रसंगी मी त्यांना काय उत्तर द्यायचे ते देईलच. यावेळी सत्तार यांनी देखील भुमरेंना विधानसभेसाठी ब्रेक घेऊन तरुणांना संधी देण्याचा सल्ला दिला. वेळ पडल्यास तुम्ही लोकसभा लढा असे देखील सत्तार म्हणाले, याप्रसंगी कार्यक्रमाचे संचालन अरुण काळे व दशरथ खराद यांनी केले.
मान्यवरांचे स्वागत पंचायत समितीच्या वतीने गटविकास अधिकारी काळुराम बागुल, शाखा अभियंता संभाजी असोले, राजेश साळवे यांनी केले. ग्रामविकास तथा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद अध्यक्षा मिनाताई शेळके, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, तहसीलदार चंद्रकांत शेळके, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांची प्रमुख उपस्थितीत हा जाहीर कार्यक्रम पार पडला.
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाबमध्ये ‘आप’ जिंकल्यास नागरिकांना मोफत वीज देणार; केजरीवालांची घोषणा
- वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या भाजप खा.साक्षी महाराजांची फसवणूक
- अॅथलेटिक्स ट्रॅकवर नेत्यांच्या गाड्या, पवारांच्या प्रकृतीच्या कारणाचा केदारांनी केला ढालीसारखा वापर
- ‘दलितांच्या मतांवर आरपीयचाही हक्क’ ; उत्तरप्रदेशात भाजपकडे केली ‘इतक्या’ जागांची मागणी
- पंजाबमध्ये ‘आप’ जिंकल्यास नागरिकांना मोफत वीज देणार; केजरीवालांची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
