Share

अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकवर नेत्यांच्या गाड्या, पवारांच्या प्रकृतीच्या कारणाचा केदारांनी केला ढालीसारखा वापर 

Published On: 

🕒 1 min read

पुणे : म्हाळुंगे – बालेवाडी या परिसरात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारले जाणार आहे. क्रीडा विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी शनिवारी येथे एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार, राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्यासह अनेक प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या बैठकीला हजेरी लावणाऱ्या या नेत्यांच्या गाड्यांचा ताफा चक्क मुख्य ॲथलेटिक्स स्टेडियमच्या ट्रॅकवर उभा करण्यात आला होता.

या गाड्यांच्या पार्किंगमुळे ट्रॅकचे नुकसान झाले. हा ट्रॅक उभारण्यासाठी पाच कोटी रुपयांहून अधिक खर्च येतो. यावर जड वस्तू ठेवल्या गेल्या, तर त्याचे नुकसान होते व त्याचा फटका धावपटूंना दुखापत होण्यामध्ये होतो. साहजिकच या ट्रॅकची जास्त काळजी घेतली जाते; पण मंत्र्यांच्या मर्जीपुढे खेळाडू कोण, अशी मानसिकता असलेल्या अधिकाऱ्यांनी आपले प्राधान्य कशाला असते, हे दाखवून दिले आहे.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडानगरीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून मुख्य स्टेडियममध्ये अ‍ॅथलेटिक्सचा सिंथेटिक ट्रॅक उभारण्यात आलेला आहे. स्टेडियमच्या कडेला असलेल्या दोन मजली इमारतीमध्ये स्पर्धेच्या काळात वापरण्यासाठीची दालने आहेत. पण त्यांचा क्रीडा संचालनालयातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी ताबा घेत तेथे कार्यालये थाटली आहेत. मुख्य इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावरील बैठक कक्षामध्ये जाण्यासाठी लिफ्ट आहेत. तर स्टेडियमची रचना अशी आहे, की अ‍ॅथलेटिक्सची धावपट्टी दुसऱ्या मजल्याला समांतर आहे. मंत्र्यांना लिफ्टने जाण्याचा त्रास नको म्हणून या धावपट्टीवर गाड्या आणून, त्यांना विनासायास बैठक कक्षात जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती, असं बोललं जात आहे. इतकंच नाही, तर सर्व मान्यवर बैठकीसाठी आल्यानंतर ही वाहने बैठक संपेपर्यंत तेथेच उभी होती. बैठकीच्या ठिकाणी जाण्यास नेत्यांना अडचण येऊ नये, यासाठी हा उद्योग करण्यात आला होता.

दरम्यान, चौफेर टीका होऊ लागल्यानंतर आता या सर्व प्रकाराबाबत बोलताना क्रीडामंत्री सुनील केदार यांनी दिलगिरी व्यक्त केली असून जे झालं ते चुकीचं झालं असं देखील केदार यांनी म्हटलं आहे. खा. शरद पवार यांची तब्येत पाहून गाड्या ट्रॅकवर नेण्यात आल्याचं सांगत केदार यांनी वेळ मारून नेली. पवार यांच्या पायाचे मागे ऑपरेशन झाले आहे तसेच त्यांना पायी जास्त चालावे लागू नये यासाठी त्यांची गाडी तिथे नेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान,ज्यावेळी हा सर्व प्रकार घडला त्यावेळी  सुनील केदार यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. त्यांनी याकडे हसून दुर्लक्ष केले होते. मात्र, क्रीडामंत्र्यांची गाडीही त्याच ट्रॅकवरून गेली होती असे आता सांगितले जात आहे.  क्रीडामंत्री असूनही आंतरराष्ट्रीय सिंथेटिक ट्रॅकचे महत्त्व  कळत नाही का ?  असा सवाल सोशल मिडीयावर विचारला जात असून  क्रीडामंत्री सुनील केदार यांनी याबाबत माफी मागावी, असी मागणीही क्रीडाप्रेमींनी केली आहे.

पवार यांच्या प्रकृतीचे कारण केदार देत असले तरीही फक्त पवारच नव्हे तर अनेक गाड्या त्याठिकाणी होत्या असं दिसून येत आहे. पवारांच्या प्रकृतीच्या कारणाचा केदारांनी केला ढालीसारखा वापर केला असल्याचे दिसून येत आहे. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर आता संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी धावपटू, क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त करत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या ॲथलेटिकच्या ट्रॅकवर अशा पद्धतीने वाहनांचा ताफा उभा करणे ही मुजोरी असल्याचा आरोप देखील होऊ लागला आहे. सोबतच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, जेणेकरून असा प्रकार पुन्हा घडणार नाही, अशी मागणी देखील होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!