Share

‘फडणवीसांवर विश्वास कसा ठेवणार? त्यांनी ‘या’ दोन भीष्मप्रतिज्ञा मोडल्यात!’, खडसेंचा हल्लाबोल

Published On: 

जळगाव : ओबीसी आरक्षण पूर्ववत करुन न दिल्या राजकीय संन्यास घेईन अशी गर्जना करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाविकास आघाडीचे नेते हल्लाबोल करत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले की, वेगळा विदर्भ झाला नाही तर लग्न करणार नाही, अशी शपथ फडणवीसांनी घेतली होती. परंतु, त्यांनी लग्न केले आणि त्यांना मुलगीही झाली. तसेच फडणवीस यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणार नाही, असेही सांगितले होते. पण पहाटे त्याच राष्ट्रवादी काँग्रेससोबत शपथ घेतल्याची आठवणही खडसे यांनी करुन दिली. त्यामुळे या सर्व त्यांच्या वगल्ना आहेत.

फडणवीसांची दुटप्पी भूमिका
त्यांना सत्ता मिळाली तरच ते ओबीसींचा प्रश्न सोडविणार, नाही दिली तर ते ओबीसी प्रश्नाला विरोध करणार ही भूमिका चुकीची आहे. ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारने जनगणनेचा डाटा उपलब्ध करून दिला तर राज्य सरकार त्यावर काम करू शकणार आहे. मात्र, एकीकडे केंद्राकडून हा डाटा मिळू द्यायचा नाही आणि दुसरीकडे आम्ही ओबीसींचे पाठीराखे आहोत असे म्हणायचे, ही भाजपाची दुटप्पी भूमिका आहे असे खडसे म्हणाले.

५ वर्षांत केंद्राकडून डाटा का आणला नाही?
ओबीसी आरक्षण हा काही आजचा विषय नाही. २०११ मध्ये त्यासंदर्भात प्रयत्न झाले होते. तेव्हा जनगणना झाली होती. त्याचा डाटा केंद्र सरकारकडे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी २ वेळा हा डाटा उपलब्ध व्हावा म्हणून पंतप्रधानांना पत्र लिहिले. पंकजा मुंडे तसेच छगन भुजबळ यांनीही याबाबत पत्र लिहिले आहे. परंतु, केंद्र सरकारने त्याला प्रतिसाद दिलेला नाही. ५ वर्षांच्या कालखंडात फडणवीस यांनी केंद्राकडून डाटा आणून ओबीसींना आरक्षण का दिले नाही? असा सवाल खडसेंनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!