Share

पेशावरला नमवत मुल्तानने पहिल्यांदाच पटकावले पीएसएल स्पर्धचे विजेतेपद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गुरुवारी झालेल्या पीएसएल स्पर्धेतील अंतिम सामन्यात मुल्तान सुल्तानने पेशावर संघाचा 47 धावांनी पराभव करत पहिल्यांदा पीएसएल स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. मुल्तानने दिलेल्या 206 धावांचा पाठलाग करताना पेशावरला केवळ 159 धावांची मजल मारता आली. वादळी अर्धशतक करणाऱ्या शोएब मकसुदला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

पाकिस्तान प्रिमीअर लीग स्पर्धेच्या या अंतिम सामन्यात पेशावर संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुल्ताने संघाने 8 षटकातच 68 धावांची अर्धशतकी सलामी देत पेशावर संघाचा हा निर्णय चुकीचा ठरवला. निर्धारीत 20 षटकात मुल्तान संघाने 4 गडी गमावत 206 धावांची मजल मारली. मुल्तानकडुन शोएब मकसुदने 35 चेंडुत 6 चौकार आणि 3 षटकारासंह नाबाद 65 धावांची वादळी खेळी साकारली. रिले रसौने त्याला चांगली साथ देत अवघ्या 21 चेंडुत 5 चौकार आणि 3 षटकारासंह 50 धावा केल्या.

प्रत्युत्तरात पेशावर संघाने 6 षटकांत 42 धावांची सलामी दिली. मात्र यानंतर कालातंराने गडी बाद होत गेल्याने निर्धारीत 20 षटकात पेशावर संघाने 9 गडी गमावत 159 धावांची मजल मारली. यासह मुल्तान संघाने पहिल्यांदाच पाकिस्तान प्रिमीअर लीग स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. शोएब मलिकने पेशावर संघाकडुन 28 चेंडुत 3 चौकार आणि 3 षटकारासंह सर्वाधिक 48 धावांची खेळी साकारली. तर मुल्तान संघाकडुन इम्रान ताहीरने सर्वाधीक 3 गडी बाद केले. वादळी अर्धशतकासाठी शोएब मकसुदला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!