🕒 1 min read
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुण्यातील नव्या पक्ष पक्षकार्यालयाला भेट दिली. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांचा पक्षप्रवेश देखील शरद पवार यांच्या हजेरीत पार पडला. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी नेते उपस्थित होते.
दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर सक्रिय झालेले शरद पवार काही दिवस दिल्ली दौऱ्यावर गेले होते. शरद पवार राष्ट्रीय पातळीवर राजकीय खेळी करण्याचे प्रयत्न करत असल्याच्या चर्चा रंगल्या असून निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि पवारांच्या भेटीने सस्पेन्स अधिक वाढलाय. यासोबतच, त्यांनी भाजपविरोधी प्रादेशीक पक्षांच्या १५ ते २० नेत्यांची बैठक देखील घेतली. यात शिवसेना आणि काँग्रेसला निमंत्रण नव्हतं. पवार हे काँग्रेसविरहित भाजपविरोधी आघाडी निर्माण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
आता या सर्व चर्चांवर खुद्द शरद पवार यांनी भाष्य केलंय. ‘आघाडी म्हणून आम्ही आत्ता बसलो नाही, पण पर्यायी शक्ती उभी करायची असेल तर ती काँग्रेसला बरोबर घेऊनच करण्याची गरज आहे, असं माझं मत आहे. मी त्या बैठकीतही ते मांडलं. आघाडीचा चेहरा कोण असावं यावर सध्या आम्ही चर्चा केलेली नाही. पण मला वाटतं सामूहिक नेतृत्व हे सूत्र पुढं ठेऊन आम्हाला पुढे जावं लागेल,’ असं शरद पवार म्हणाले.
यासोबतच, ‘शरद पवार यांनी फार वर्षे असले उद्योग केले आहेत. त्यामुळे सध्या हे नको. त्यांना मदत करणं, मार्गदर्शन करणं, त्यांना शक्ती देणं, त्यांना एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करणं हीच माझी भूमिका असेल. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनतेला काही पर्याय द्यावा अशी लोकांमध्ये भावना आहे. ही लोकइच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी राजकीय नेतृत्वाची असते. ती जबाबदारी आम्हाला निश्चित पूर्ण करावी लागेल,’ असं देखील पवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या पुण्यातील नव्या कार्यालयाला शरद पवारांनी दिली भेट; ‘त्या’ वादावर केलं उपरोधिक भाष्य
- ‘प्रदेश कार्यकारिणीत ठराव करून मागणी करायची म्हणजे आरोपीने केलेल्या मागणीला पाठिंबा द्यायचा’
- मराठवाड्याला अतिरीक्त पाणी देण्याचे सरकारचे नियोजन- जयंत पाटील
- खासगी कोचिंग क्सासेससाठी आमदार अंबादास दानवे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे शिष्टाई
- ‘काही जणांची CBI चौकशीची मागणी केल्यावर संजय राऊतांच्या छातीत कळ का आली ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
