Share

१५ वर्षानंतर राष्ट्रपतींचा रेल्वे प्रवास, २००६ मध्ये डॉ. अब्दुल कलाम यांनी केला होता देहरादूनचा प्रवास

Published On: 

नवी दिल्ली : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी दिल्लीतील सफदरजंग रेल्वे स्थानकातून खास राष्ट्रपतींसाठीच्या रेल्वेगाडीतून कानपूरला प्रयाण केले. ही गाडी कानपूर मधील झिंझाक आणि कानपूर देहातच्या रुरा येथे दोन थांबे घेईल, जिथे राष्ट्रपती आपल्या शालेय जीवनाच्या  दिवसांमधील जुन्या परिचितांची भेट घेतील.

हे दोन थांबे राष्ट्रपतींचे जन्मस्थान असलेल्या कानपूर देहातच्या परौन्ख गावाजवळ असून तेथे त्यांच्या सन्मानार्थ २७ जून रोजी दोन कार्यक्रम होणार आहेत. राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते प्रथमच आपल्या जन्मस्थळी भेट देत आहेत. या ठिकाणी यापूर्वी भेट द्यायची त्यांची इच्छा होती, परंतु महामारीमुळे ते शक्य झाले नाही. २८ जून रोजी राष्ट्रपती कानपूर स्थानकातून रेल्वेगाडीतून लखनौला दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी जातील. २९ जून रोजी ते विशेष विमानाने नवी दिल्लीला परतणार आहेत. त्यांनी निवडलेल्या रेल्वे मार्गाने प्रवासाची पद्धत ही अनेक राष्ट्रपतींच्या परंपरेनुसार आहे. ज्यांनी देशाच्या निरनिराळ्या भागातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी रेल्वे प्रवास केला होता.

१५ वर्षानंतर राष्ट्रपतीपदावरील व्यक्ती रेल्वे प्रवास करणार आहे. यापूर्वी २००६ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी भारतीय लष्कर अकादमीत (आयएमए) कॅडेट्सच्या पासिंग आउट परेडमध्ये भाग घेण्यासाठी दिल्ली ते देहरादून विशेष रेल्वेने प्रवास केला होता. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी अनेकदा रेल्वे प्रवास केला होता. राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी बिहार दौऱ्यादरम्यान सिवान जिल्ह्यातील त्यांचे जन्मस्थान झिरादेई येथे भेट दिली. ते छपरा येथून झिरादेईला जाण्यासाठी राष्ट्रपतींच्या विशेष रेल्वेगाडीत बसले आणि त्यांनी तिथे तीन दिवस वास्तव्य केले. त्यांनी रेल्वेने देशभर प्रवास केला. डॉ. प्रसाद यांच्या नंतरच्या राष्ट्रपतींनी देखील देशातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!