औरंगाबाद : केवळ एका दिवसापुरता योग अभ्यास न करता त्यात सातत्य ठेवावे. ज्याप्रमाणे योग अभ्यास मनाला समृद्ध करतो. त्याप्रमाणेच नागरिकांनी वसुंधरेला देखील समृद्ध करण्यासाठी पुढाकार घ्यावा. स्वच्छता राखण्याबरोबरच वृक्ष संरक्षण, संवर्धन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग विविध योग संस्थेच्या वतीने विभागीय क्रीडा संकुलात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्त्व देशाला पटवून दिले आहे. जीवनशैली समृद्ध करण्यात योगाचे महत्त्व आहे. योग अभ्यासाबरोबरच वसुंधरेला समृद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आग्रही आहेत. योग करण्याबरोबरच वसुंधरेच्या संरक्षणासाठी सर्वांनी स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. परिसर स्वच्छ ठेवावा. झाडांची निगा राखावी, वसुंधरेच्या संरक्षणासह संवर्धनाची जबाबदारी नागरिकांनी पार पाडावी, असेही श्री. चव्हाण यावेळी म्हणाले.
प्रशिक्षक पाठक व चमूने ताडासन, पादहस्तासन, अर्ध चक्रासन, त्रिकोणासन, दंडासन, भद्रासन आदींसह उभे राहून, बसून, पोटावरील, पाठीवरील योगासने, विविध प्रकारचे प्राणायाम करत उपस्थितांचा योग अभ्यास वर्ग घेतला. योग अभ्यासाचा शेवट प्रार्थना आणि संकल्प करत, शांती पठनाने झाला. तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवार यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या
- शहराबरोबरच औरंगाबाद ग्रामीणमध्येही व्यापऱ्यांचा लसीकरणाला प्रतिसाद
- एमजेपीचे बंद फ्लो मीटरच्या आधारे वॉटर ऑडिट, औरंगाबादकरांचे २० एमएलडी पाणी वाढवणार कसे?
- ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सुरक्षेत झाली ‘ही’ मोठी चूक ; १४ पोलीस कर्मचाऱ्यांचे तातडीने निलंबन
- औरंगाबादकरांना दिलासा; नव्या पाणीपुरवठा योजनेत ९ जलकुंभाच्या डिझाइनला मंजुरी
- ‘अजित दादांवरील टीका कमरेखाली गेली की ‘प्रसाद’ही भेटतो, हे लक्षा ठेवा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
