Share

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सुरक्षेत झाली ‘ही’ मोठी चूक ; १४ पोलीस कर्मचाऱ्यांचे तातडीने निलंबन

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सुरक्षेत मोठी चूक केल्याचं उघड झालं आहे. दिल्लीहून ग्वालियरच्या दिशेने जाणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांची कार निरावली गावापासून हजीरा चौकापर्यंत जवळपास ७ किमी विनासुरक्षा एकटीच जात होती. या निष्काळजीपणामुळे ग्वालियर आणि मुरैना पोलीस ठाण्यातील १४ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, मुरैना ते ग्वाल्हेर दरम्यान त्यांच्या गाडीच्या सुरक्षेसाठी तैनात एस्कॉर्ट वाहन तब्बल 8 किमीपर्यंत कोणा दुसऱ्या गाडीचा पाठलाग करीत होता. या निष्काळजीपणामुळे 14 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांना झेड श्रेणीची व्हीआयपी सुरक्षा देण्यात आली आहे.

खासदार ज्योतिरादित्य शिंदे दिल्लीहून ग्वाल्हेरला जात होते, तेव्हा हा प्रकार घडला असल्याची माहिती सध्या मिळत आहे . सायंकाळी मुरैना जिल्ह्यातील एस्कॉर्ट वाहन शिंदेंच्या गाडीमागे ग्वाल्हेरच्या दिशेने जात होतं. निरावलीजवळ मुरैना-ग्वाल्हेर बॉर्डरवर वाहन चालक गोंधळला आणि त्याने शिंदे यांच्या गाडीचा रंग असलेल्या दुसऱ्या गाडीचा पाठलाग सुरू केला.

8 किमीपर्यंत पोलीस चुकीच्या रस्त्याने जात होती. साधारण 8 किलोमीटरपर्यंत पोलीस चुकीच्या रस्त्याने जात होती. जेव्हा पोलिसांना त्यांची चूक लक्षात आली तेव्हा त्यांना धक्काच बसला. दरम्यान शिंदेंची गाडी खूप पुढे निघून गेली होती. जेव्हा शिंदेची गाडी हजारी पोलीस ठाण्याच्या समोरुन गेली तेव्हा सुरक्षेत चूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर कारवाई करीत मुरैनातील 9 आणि ग्वाल्हेर ठाण्यातील 5 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आले आहे.

दरम्यान ज्योतिरादित्य शिंदे यांची गाडी विनासुरक्षा जात असल्याचं उघड होताच पोलीस विभागातंर्गत चौकशी करण्यात आली. त्यात ग्वालियर आणि मुरैना येथील पोलीस कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणावर ठपका ठेवण्यात आला.

मुरैना जिल्ह्यातून खासदार ज्योतिरादित्य शिंदे रवाना झाले तेव्हा त्यांच्या पायलटिंग वाहनात ९ पोलीस कर्मचारी होते. तर ग्वालियर जिल्ह्यातील सीमेत शिंदे यांना घेऊन जाण्यासाठी ५ कर्मचारी होते. या दोन्ही टीमचं आपापसात संवाद झाला नाही. ताळमेळ नसल्याने ग्वालियरच्या टीमनं दुसऱ्याच गाडीला फॉलो करत राहिली. त्यामुळे या प्रकारात १४ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले असल्याची माहिती सध्या मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!