औरंगाबाद : नवीन जलयोजनेचे काम पूर्ण होईपर्यंत जुन्या जलयोजनांवरील यंत्रणेत दुरूस्ती करून किमान २० एमएलडी पाणी वाढवण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (एमजेपी) माध्यमातून यंत्रणेचे वॉटर ऑडिट करण्याचे आदेश मनपा प्रशासक पांडेय यांनी दिले आहेत. मात्र एमजेपीने बंद फ्लो मीटरच्या आधारेच वॉटर ऑडिट केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या ऑडिटवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एमजेपी लवकरच वॉटर ऑडिटचे मनपाकडे सादरीकरण करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहराला ७०० आणि १४०० मि.मी.व्यासाच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. या दोन्ही वाहिन्या कालबाह्य झाल्या असल्याने सध्या आठवड्यात एकदाच शहरवासियांना पाणीपुरवठा करण्यात येतो. राज्य सरकारने १६८० कोटींची नवीन जलयोजना मंजूर केली आहे. मात्र या योजनेचे काम पूर्ण होण्यास तीन वर्षांचा अवधी लागणार आहे. तोपर्यंत उपलब्ध पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून २० एमएलडी पाणी वाढवण्याचा मनपाचा प्रयत्न आहे.
डिसेंबरपर्यंत पन्नास एमएलडी पाणी वाढवले जाईल, असेही पालकमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर केले आहे. तत्पूर्वी वीस एमएलडी पाणी वाढवण्यासाठी अगोदर वॉटर ऑडिट केले पाहीजे, अशी भूमिका मनपा प्रशासक पांडेय यांनी घेतली असून एमजेपीकडून ऑडिट करण्यात आले. दोन्ही योजनांवरील वॉटर फ्लो मीटर बंद आहेत. त्यामुळे वॉटर ऑडिट करताना एमजेपीच्या चमूला अडचणी आल्या. परंतु या अडचणीतून मार्ग काढत एमजेपीने ऑडिट पूर्ण केले असून लवकरच हा अहवाल प्रशासकांना सादर करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- माकडाने आख्या गावाला केले परेशान, गाड्यांच्या काचांसह टीव्हीही फोडला
- पोलीस स्टेशनला येऊ शकत नाही, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तपासात सहकार्य करू – ट्वीटर
- ‘अजित पवार मोकळे कसे ? त्यांना कायदा लागू होत नाही का ?’; अतुल भातखळकरांचा सवाल
- केंद्राचा धडाका ; आता ‘या’ दोन मोठ्या बँकांचंही होणार खासगीकरण
- डॉक्टरांची अशीही बांधिलकी, धन्वंतरी असोसिएशनच्या माध्यमातून १० हजार वृक्ष लागवड

