औरंगाबाद: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीम जोरात सुरू झाली होती. मात्र गेल्या महिन्यात लाशीचा मोठा तुटवडा जाणवायला लागला होता. मात्र पुन्हा एकदा आता लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून त्याला आता नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शनिवार पासून ३० ते ४४ या वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे त्यासाठी शहरात तसेच ग्रामीण भागात देखील नागरिक तसेच व्यापारी वर्ग चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत.
जिल्ह्यातील बाजारसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. तर शनिवारी रोजी फक्त ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठीच लस उपलब्ध होती. मात्र त्यावरील वयोगटातील नागरिकांना लसी अभावी परत जावे लागल्यामुळे काही नागरिकांनी नाराज झाल्याचे देखील पाहायला मिळाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलेच थैमान घातले असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे त्यामुळे नागरिक लस घेण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेताना दिसत आहेत.
कोरोनाला घेऊन मोठी जनजागृती झाल्याने नागरिक स्वतःहून लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रात गर्दी करत आहे. परंतु आरोग्य केंद्रात लस उपलब्ध नसल्याने नागरिकांचे हेलपाटे होत आहे. बाजारसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाच आरोग्य उपकेंद्रे असून पंचवीस दरम्यान गावे केंद्रांतर्गत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष घालून सर्व वयोगटातील नागरिकांसाठी लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अल्लाह’ म्हटल्याने योगाची शक्ती कमी होत नाही! काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
- सेवेत सामावुन घ्या! प्रलंबित मागण्यांसाठी आशा, गटप्रवर्तकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
- केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून सरकार अस्थिर करण्याचे षडयंत्र : नाना पटोले
- कोरोनाचा परिणाम; फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लातूरकरांचा ‘योग दिन’
- आजपासून ३२ स्मार्ट सिटी बस रस्त्यावर, १२ मार्गांवर होणार ४४४ फेऱ्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

